Mahindra Thar esakal
विज्ञान-तंत्र

Mahindra Thar ची जोरदार खरेदी, जानेवारीत मोठ्या प्रमाणावर वाढली विक्री

महिंद्राची 'ही' कार लोकांमध्ये लोकप्रिय

सकाळ डिजिटल टीम

महिंद्राची सर्वात लोकप्रिय एसयूव्हीपैकी एक महिंद्रा थारच्या (Mahindra Thar) प्रेमात लोक पडले आहेत. तिच्या विक्रीत जबरदस्त वाढ पाहायला मिळत आहे. जानेवारीत तिच्या विक्रीत खूपच वाढ नोंदविली गेली आहे. जाणून घ्या किती युनिट या एसयूव्हीची विक्री झाली आणि तिचे वैशिष्ट्ये...

नवीन थारची लोकप्रियता

महिंद्रा अँड महिंद्राने (Mahindra And Mahindra) आपली नवीन महिंद्रा थारची विक्री सप्टेंबर २०२० मध्ये सुरु केली होती. तेव्हापासून तिच्या मागणी वाढत आहे. त्यामुळे कंपनीने तिचे उत्पादनही वाढवले आहे. (Mahindra Thar Sales Rise In January 2022)

जानेवारीत ४७ टक्क्यांनी वाढली विक्री

जानेवारी २०२२ मध्ये महिंद्रा थारच्या विक्रीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. तिची विक्री जानेवारी २०२१ च्या तुलनेत ४७.४ टक्क्यांनी वाढली आहे. दुसरीकडे डिसेंबर २०२१ च्या तुलनेत विक्रीत ११७.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. महिंद्रा अँड महिंद्राने जानेवारीत महिंद्रा थारची ४ हजार ६४६ युनिटची विक्री केली आहे. दुसरीकडे जानेवारी २०२१ मध्ये हा आकडा केवळ ३ हजार १५२ होते. डिसेंबर २०२१ मध्ये महिंद्रा थारची २ हजार १३८ युनिट विक्री झाली होती.

फिचर्स आणि किंमत

महिंद्रा अँड महिंद्रा वेगवेगळ्या एसयूव्हीची विक्री करते. यात महिंद्रा बोलेरो, महिंद्रा स्काॅर्पियो आणि नवीन महिंद्रा एक्सयूव्ही ७०० आदींचा समावेश आहे. या व्यतिरिक्त महिंद्रा थार कंपनीची सर्वात विकली जाणारी एसयूव्ही आहे. महिंद्रा थार दोन इंजिनच्या पर्यायाबरोबर येते. यात २.० लीटरचे टर्बो-पेट्रोल इंजिन आणि २.२ लीटरचे टर्बो डिझेल पर्याय उपलब्ध आहे. हे माॅडल १५० पीएसचे मॅक्स पाॅवर आणि ३२० एनएमचे पीक टाॅर्क अथवा १३० पीएसचे मॅक्स पाॅवर आणि ३०० एनएमचे पीक टाॅर्क जनरेट करते. महिंद्रा थारची सध्याची किंमत १३.१७ लाख रुपयांपासून ते १५.५३ लाखांदरम्यान आहे. नुकतेच कंपनीने तिची नवीन जाहिरात प्रसिद्ध केली होती. ते सोशल मीडियावर प्रचंड व्हायरला झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : वारजेत एका व्यक्तीकडून जिवंत काडतुसे आणि पिस्तुल जप्त

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT