WhatsApp  esakal
विज्ञान-तंत्र

Whatsapp Scam: सावधान, व्हॉट्सअ‍ॅपवर ही लिंक आली तर...

एक नवा व्हॉट्सअ‍ॅप स्कॅम सध्या अनेकांना त्रासदायक ठरतो आहे

सकाळ डिजिटल टीम

मिळालेल्या माहितीनुसार, Rediroff.com वरून फसवणारे लोकं, घोटाळा करून तुमच्या बँक आणि कार्ड तपशीलाची माहिती चोरण्याचे काम करत आहे.

एक नवा व्हॉट्सअ‍ॅप स्कॅम (Whatsapp Scam) सध्या अनेकांना त्रासदायक ठरतो आहे. Rediroff.com असे त्याचे नाव असून तो गेले काही दिवस व्हॉट्सअ‍ॅपवर (Whatsapp) अनेकांच्या अकाऊंटला त्रास देत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फसवणारे लोकं, घोटाळा करून तुमच्या बँक आणि कार्ड तपशीलाची माहिती चोरण्याचे काम करत आहे. यामुळे तुमच्या Android आणि iOS स्मार्टफोन बरोबरच Windows PC ला नुकसान होऊ शकते. (Care From Whatsapp Scam)

WhatsApp

नवा WhatsApp scam कसा आहे?

या स्कॅमची सुरूवात कशी झाली हे माहिती नाही. पण, सीएनबीसीने दिलेल्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅप युझर्सना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. स्कॅममध्ये युजर्सना महागड्या भेटवस्तूंचे आमिष दाखवले जाते. रिपोर्टनुसार, युजर्सना व्हॉट्सअ‍ॅपवर फसवणूक करणारे एक लिंक पाठवतात. लिंकवर क्लिक केल्यावर एक वेबसाईट उघडते. त्यावर तुम्ही हा फॉर्म भरलात की तुम्हाला बक्षीस मिळेल असे लिहिलेले असते. तुम्ही प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर, तो फॉर्म वेबसाइटवर पाठवले जातो. तेथे तुम्हाला तुमचे नाव, वय, पत्ता, बँक खाते आणि इतर वैयक्तिक डेटासह त्यांची काही माहिती भरण्यास सांगितले जाते. सर्व डिटेल्स भरल्यानंतर हा डेटा फसवणूक करणाऱ्यांपर्यंत पोहोचतो. स्कॅमर हा डेटा व्यवहार किंवा इतर बेकायदेशीर कामांसाठी वापरतात. स्कॅमर तुमच्या डिव्हाईसवर नको असेलेले एप्लिकेशन्स इंस्टोल करतात.(Care From Whatsapp Scam)

या गोष्टी लक्षात ठेवा

जर तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर Rediroff.ru कडून काही लिंक आली तर लगेच स्पॅम म्हणून नोंद करा आणि तो हटवा. तुम्ही चुकून त्यावर क्लिक केल्यास कोणत्याही मालवेअर किंवा व्हायरससाठी तुमचे डिव्हाइस स्कॅन करावे. (Care From Whatsapp Scam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDIA Alliance News : 'मतचोरीच्या' विरोधात 'I.N.D.I.A' आघाडीचा 'मतदार हक्क यात्रा'द्वारे बिहारमध्ये एल्गार!

हसत खेळत असलेली बाई अशी... पुर्णा आजीच्या जाण्याचा प्रेक्षकांनाही बसला धक्का; म्हणाले- मन मानायलाच तयार नाही की...

WhatsApp: एक व्हिडिओ कॉल अन् बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या कसा होतोय लेटेस्ट फ्रॉड

Thane Traffic: ठाणेकरांच्या उत्साहाला कोंडीचे ग्रहण, अनेक रस्ते बंद; पर्यायी मार्गावर वाहनांच्या रांगा

Dog Bite : इंदापूर शहरात 13 हून अधिक जणांना पिसाळलेल्या कुत्र्याचा चावा; लस उपलब्ध नसल्याने रुग्णांची धावाधाव

SCROLL FOR NEXT