Umang App 7/12 Utara Esakal
विज्ञान-तंत्र

Umang App : आता मोबाईलवर डाऊनलोड करता येणार सातबारा उतारा, जाणून घ्या प्रक्रिया

महा-ई सेवा केंद्रावर जाणे, झेरॉक्स काढणे अशा गोष्टींची कटकट आता राहणार नाही.

Sudesh

डिजिटल सातबारा उतारे सध्या ऑनलाईन उपलब्ध आहेत. मात्र, हे घेण्यासाठीही आतापर्यंत नागरिकांना महाभूमी पोर्टलवर जावं लागत होतं. तसंच कोणाला हा उतारा पाठवायचा झाल्यास, प्रिंट काढून मग पाठवावा लागत होता. आता मात्र तुम्हाला थेट तुमच्या मोबाईलवर सातबारा उतारा डाऊनलोड करता येणार आहे.

केंद्र सरकारने विकसित केलेल्या उमंग अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही सातबारा उतारा मोबाईलवरच डाऊनलोड करु शकता. राज्यातील सर्व अडीच कोटी सातबारा उतारे त्यावर उपलब्ध असणार आहेत. डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही हा उतारा पुढे शेअरही करू शकता. त्यामुळे महा-ई सेवा केंद्रावर जाणे, झेरॉक्स काढणे अशा गोष्टींची कटकट आता राहणार नाही.

उमंग अ‍ॅप करा डाऊनलोड

यासाठी तुम्हाला उमंग हे अ‍ॅप डाऊनलोड करावं लागेल. अँड्रॉईड मोबाईल असणाऱ्यांसाठी गुगल प्ले स्टोअर आणि आयफोन असणाऱ्यांसाठी अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरवरुन हे अ‍ॅप डाऊनलोड करता येईल. हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर त्यामध्ये अकाउंट तयार करावे लागेल.

अकाउंट तयार केल्यानंतर लॉग-इन करून तुम्हाला आपल्या खात्यावर पैसे भरावे लागतील. यानंतर तुम्हाला तुमचा सातबारा उतारा डाऊनलोड करता येईल.

१५ रुपये चार्जेस

सातबारा उतारा डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला १५ रुपये चार्जेस लागणार आहेत. महाभूमी पोर्टलवरुन डाऊनलोड करण्यासाठी देखील एवढेच शुल्क आकारले जाते. मात्र, कित्येक वेळा महा-ई सेवा केंद्र, खासगी इंटरनेट कॅफे, झेरॉक्स सेंटर यामध्ये आपले चार्जेस देखील जोडून घेतात. तसंच प्रत्येक वेळी कुठे उतारा पाठवायचा झाल्यास पैसे खर्च करून पुन्हा पुन्हा उतारा काढावा लागत होता. मात्र, आता फोनवर डाऊनलोड करता येत असल्यामुळे, नागरिकांना एकदाच खर्च करावा लागणार आहे.

राज्यातील दीड ते दोन लाख नागरिक दररोज महाभूमी पोर्टलचा वापर करतात. आतापर्यंत या पोर्टलवरून सातबारा उतारे, फेरफार, खाते उतारे, मिळकत पत्रिका असे सुमारे साडेपाच कोटी नमुने डाऊनलोड करण्यात आले आहेत. यातून राज्य सरकारला कोट्यवधींचा महसूल मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Alert : हवामान विभागाचा अंदाज आला, पाऊस वाढणार; मध्य महाराष्ट्रासह कोकण किनारपट्टीवर पावसाचा इशारा

Latest Maharashtra News Updates : अहिल्यादेवी होळकर यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट

ENG vs IND: बेन स्टोक्स १०० षटकं फेकतोय अन् आपल्या हिरोंचा वर्क लोडवरून ठणाणा! पाहा कोणी किती षटकं केलीय गोलंदाजी

Maharashtra rain forecast: उन्हाचा कडाका बस्स..! , राज्यभरात आता विजांसह पावसाचा इशारा

Pali News : भरवस्तीत आले दुर्मिळ खवले मांजर; तरुणांनी रक्षण करत वनविभागाकडे केले सुपूर्द

SCROLL FOR NEXT