people afraid due to new policies of whatsapp nagpur news 
विज्ञान-तंत्र

एका व्हॉट्सअ‌ॅपमुळे बारा भानगडी! खासगी माहिती पुढे येण्याची भीती

राजेश प्रायकर

नागपूर : निरोप देणे-घेणेच नव्हे तर माहिती शेअर करण्यापासून 'चुपके चुपके` ऑनलाइन रोमांस करणाऱ्या तरुणाईपर्यंत साऱ्यांसाठी सुलभ संवादाचे माध्यम असलेल्या व्हॉट्सअ‌ॅपच्या नव्या पॉलिसीमुळे अनेक भानगडी निर्माण झाल्या आहेत. खासगी माहिती चव्हाट्यावर येणार असल्याच्या चर्चांमुळे अनेकजण 'चॅटिंग'साठी नव्या पर्यायाचा शोध घेताना दिसून येत आहे. दरम्यान, व्हॉटसअ‌ॅपने ट्विट करून नागरिकांची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला असला तरी अनेकांमध्ये अजूनही संभ्रम कायम आहे. 

जगाच्या एकूण लोकसंख्येच्या २५ टक्के नागरिक संवादासाठी व्हॉट्‍सअ‌ॅपचा वापर करीत आहे. भारतात जवळपास चाळीस कोटी नागरिक हे ‍अ‌ॅप वापरत आहेत. भारतातील ग्राहक नव्या धोरणामुळे नव्या पर्यायाच्या शोधात लागताच व्हॉटसअ‌ॅपने ट्विट करून स्पष्टीकरण दिले. परंतु, हे ट्विटही अनेकांपर्यंत पोहोचले नसल्याने वापरकर्ते संभ्रमात आहेत. नव्या धोरणामुळे खासगी माहिती सार्वजनिक होणार असल्याची भीती नागरिकांत आहे. विशेषतः दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत चॅटिंग करणाऱ्या प्रेमीयुगुलाच्या काळजाचे ठोके वाढले आहेत. 'भानगडी' चव्हाट्यावर येण्याच्या भीतीने अनेकजण संवादाच्या इतर माध्यमाकडे वळत आहेत. भारतातील मोठा ग्राहक दुरावत असल्याने व्हॉट्सअ‌ॅपने तीन दिवसांपूर्वी ट्विट करून 'व्हॉट्सअ‌ॅप' तसेच फेसबुक खासगी संदेश पाहू शकत नाही किंवा खासगी कॉलही ऐकू शकत नाही' असे स्पष्टीकरण दिले. तसेच तुमचे लोकेशनही पाहू शकत नाही. सर्व ग्रुपही खासगी ठेवण्यात येत असल्याचे ट्विट करण्यात आलेल्या फोटोवर दिसत आहे. याशिवाय इंग्रजीत मोठ्या उताऱ्यातून काही बाबींचा खुलासा केला आहे. 

नवी पॉलिसी व्यावसायिकांसाठी? -
व्हॉट्‍सअ‌ॅपने मित्र, परिवार यांच्यातील संभाषण व व्यावसायिक संभाषणात फरक असल्याचे ट्विटमधून सांगितले आहे. ते समजून घेतले तर वापरकर्त्यांची भीती दूर होण्याची शक्यता आहे. फेसबुकवर एखादी जाहिरात दिसल्यास त्याच ठिकाणी असलेल्या एका बटनव्दारे त्या उत्पादकापर्यंत व्हॉट्‍सअ‌ॅपने मेसेज करता येते. या मेसेजमधून कुठल्या उत्पादनात रस आहे, ते ओळखून फेसबुक त्या व्यक्तीला संबंधित उत्पादनाच्या जाहिरात दाखवू शकते. एक प्रकारे नवी पॉलिसी व्यावसायिकांसाठी तसेच ऑनलाइन शॉपिंगसाठी उपयुक्त असल्याचे व्हॉट्‍सअ‌ॅपने नमुद केले आहे. 

व्हॉट्‍सअ‌ॅपसाठी भारत मोठी बाजारपेठ आहे. त्यांना येथील व्यवसाय घालविणे परवडणारे नाही. त्यामुळे व्हॉट्सअ‌ॅप धोरणात शिथिलता आणत आहे. नागरिकांनी भीतीपोटी मात्र इतर अप्लीकेशन्सकडे मोर्चा वळविला. ते अ‌ॅप्लिकेशन्स यापेक्षाही धोकादायक असू शकते. त्यामुळे व्हॉट्सअ‌ॅपच्या 'एफएक्यू' या सदरातून माहिती घेऊन विचार करावा. 
- अजित पारसे, सोशल मीडिया विश्लेषक. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

Mandangad Ghat Reopens : मुंबई, पुणे अन् महाडला जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी! अखेर 'हा' महत्त्वाचा घाटमार्ग 4 दिवसांनंतर वाहतुकीसाठी खुला; मंडणगड-दापोलीचा संपर्कही पूर्ववत

SCROLL FOR NEXT