Smartphone Explode
Smartphone Explode esakal
विज्ञान-तंत्र

Smartphone Explode : स्मार्टफोनचा स्फोट होण्याची ही आहेत कारणं; जाणून घ्या आणि सुरक्षित रहा

सकाळ डिजिटल टीम

Smartphone Explode : प्रत्येकाकडे आज स्मार्ट फोन आहे. यामध्ये लहान मुलांनाही मोठ्या प्रमाणात मोबाईल पाहण्याची सवय लागली आहे. तसेच, घरातील लोकही मुलाला खेळण्यासाठी मोबाईल देतात. परंतु, यामुळे काही घटना दुर्दैवी घडतात. या स्मार्ट फोनमुळे घडणाऱ्या वाईट घटनाही वाढल्याचे समोर आले आहे.

फोन ब्लास्ट होणं, हा त्यातलाच एक प्रकार. आपल्याला अनेकदा फोनमध्ये स्फोट झाल्याच्या बातम्या ऐकिवात येत असतात. अशीच एक घटना केरळमध्ये घडली आहे. या घटनेत आठ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे.

फोनचा स्फोट होण्यामागे नेमकी कारणं काय असतात, जाणून घेऊ

​​1. मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट

आता हे कारण म्हणजे नेमकं काय हे त्याच्या नावातच आलं आहे. मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट म्हणजेच फोन उत्पादनातील दोष.फोनचा स्फोट होण्याचे हे एक मुख्य कारण आहे. हँडसेटला पॉवर देणारी लिथियम-आयन बॅटरी फोनमध्ये फिट करण्यापूर्वी तिची योग्यरित्या चाचणी करणं आवश्यक आहे.

चुकीचा घटक किंवा असेंबली लाईनमधील बिघाडामुळे बॅटरी खराब होऊ शकते आणि परिणामी फोनचा स्फोट होऊ शकतो. हे सहसा घडते जेव्हा बॅटरीमधील सेल्स अधिक तापमानापर्यंत पोहोचतात (बाह्य उष्णता, जास्त चार्जिंग, नुकसान किंवा खराब उत्पादनामुळे सेल्सचं तापमान वाढतं. तसंच स्वस्त बॅटरीमध्ये शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता जास्त असते.

2. बॅटरीचे फिजीकल नुकसान

फोनचा स्फोट होण्याचे दुसरे कारण म्हणजे बॅटरीची फिजीकल स्थिती. काही वेळा फोन पडतो, आपटला जातो, त्यामुळे बॅटरीचे नुकसान होऊ शकते. हे बॅटरीच्या अंतर्गत यांत्रिक किंवा रासायनिक संरचनेत बदल करू शकते – ज्यामुळे शॉर्ट-सर्किट,फोन जास्त गरम होणे आणि बरेच काही होऊ शकते.

एकदा बॅटरी खराब झाल्यानंतर, ती अनेकदा फुगते.ज्यानंतर बॅटरी बदलून नवीन बॅटरी खरेदी करणंच अधिक चांगलं आहे. आजकालच्या मॉडेलमध्ये बॅटरी वेगळी काढता येत नसली तरी तुम्ही स्मार्टफोनच्या मागील पॅनेलकडे लक्षपूर्वक पाहून सांगू शकता, जर फोन अधिक जाड वाटत असेल तर समजा बॅटरी खराब झाली आहे.

3. दुसरा किंवा लोकल कंपनीचा चार्जर वापरणे

ही एक सामान्य चूक आहे जी आपल्यापैकी बहुतेकजण करतात. प्रोप्रायटरच्या चार्जरशिवाय फोन चार्ज करणं धोकादायक असू शकते. थर्ड-पार्टी चार्जर्समध्ये हँडसेटला आवश्यक असलेल्या फीचर्सची कमतरता असते. ते सारखे दिसत असले तरी ते चूकीच्याप्रकारे चार्ज करुन फोन जास्त गरम करू शकतात, फोनच्या आतील घटक खराब करू शकतात आणि तुमच्या फोनच्या बॅटरीला खराह करु शकतात. ज्यामुळे स्फोट होण्याची शक्यता आणखी वाढते.

बॅटरी खराब होण्याचं आणखी एक कारण म्हणजे अधिकवेळ म्हणजेच रात्रभर चार्जिंग करणं. आपल्यापैकी बहुतेक जण झोपायला जाताना फोन चार्जिंगवर ठेवतात. ज्यामुळे सकाळपर्यंत फोन फुल चार्ज होऊ शकतो. पण याचा थेट परिणाम बॅटरीवर होतो कारण ती जास्त चार्ज केल्याने जास्त गरम होणे, ओव्हरचार्जिंग, शॉर्ट सर्किट आणि काही वेळा स्फोट देखील होऊ शकतो.

अनेक स्मार्टफोन्स आता एका चिपसह येतात जी बॅटरीची पातळी 100 टक्के असताना विद्युत प्रवाह थांबवते. पण अजूनही काही मुठभर परवडणारे हँडसेट आहेत ज्यात हे फीचर नाही आणि म्हणूनच युजर्स रात्रभर फोन चार्जला लावून फोनचा स्फोट करु शकतात.

5. प्रोसेसर ओव्हरलोड

प्रोसेसरमुळे देखील तुमचा फोन अधिक गरम होऊ शकतो. PUBG सारख्या भारी ग्राफिक्ससह येणारे गेम खेळून किंवा मल्टी-टास्किंग यामुळे प्रोसेसरवर खूप लोड येतो. दरम्यान प्रोसेसरवर लोड वाढला की आपोआपच फोन तापतो म्हणजेच बॅटरीही तापते आणि यामुळे फोनचा स्फोट होऊ शकतो.

आजकाल हँडसेटची उष्णता नियंत्रित ठेवण्यासाठी थर्मल लॉक फीचर किंवा थर्मल पेस्ट जोडणे अनेक कंपन्यांनी सुरू केले आहे. परंतु बऱ्याच मॉडेल्समध्ये हे फीचर नसल्याने तसंच कधी कधी थर्मल लॉक निकामी झाल्याने फोन तापू शकतो. त्यामुळे अधिक हेवी काम करताना थोडी विश्रांती फोनला देणं गरजेचं आहे.

6. फोनवर थेट सूर्यप्रकाश पडणं, कारमध्ये फोन तापणं

जास्त उष्णता फोनची बॅटरी खराब करू शकते. बॅटरीच्या सेल्स अधिक उष्णतेमुळे खराब होतात. सेल्स खराब झाल्यावर एक्झोथर्मिक ब्रेकडाउन गमावतात आणि ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड सारखे वायू तयार करतात. या वायूंमुळे बॅटरी फुगू शकते आणि शेवटी स्फोट होऊ शकतो. म्हणून, उष्ण कारमध्ये तसंच कोणत्याही उष्ण ठिकाणी हँडसेट न ठेवण्याचा सल्ला दिला जातो आणि दीर्घकाळापर्यंत थेट सूर्यप्रकाशात देखील फोन ठेवू नये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

USA vs PAK : युएसएने इतिहास रचला! मुंबईकर नेत्रावळकरची सुपर ओव्हरमध्ये सुपर बॉलिंग, पाकिस्तानचा पराभव

Ajit Pawar on Baramati Result: "बारामतीत मी कमी पडलो हे निर्विवाद सत्य"; अजित पवारांची जाहीर कबुली

USA vs PAK : युएसएने पाकिस्तानचा निम्मा संघ शंभरच्या आत गुंडाळला; आफ्रिदीनं पार करून दिला 150 धावांचा टप्पा

Shooting World Cup : सरबज्योत सिंगचा सुवर्णवेध; जागतिक नेमबाजी स्पर्धेत बाजी

मोहोळच्या ज्येष्ठ नागरिकाला सोलापूरच्या रिक्षावाल्याने लुटले! कोंडीच्या पेट्रोल पंपावर नेऊन ‘फोन-पे’वरून काढले १.५ लाख रूपये

SCROLL FOR NEXT