WhatsApp Secret Chat sakal
विज्ञान-तंत्र

WhatsApp Secret Chat : WhatsApp चं नवं फिचर; आता कोणीच वाचू शकणार नाही तुमची सीक्रेट चॅट

या फिचरमुळे यूजर्सला कोणत्याही स्पेसिफिक चॅटला लॉक करता येणार आणि ही सीक्रेट चॅट युजर्सशिवाय कोणीच वाचू शकणार नाही.

निकिता जंगले

WhatsApp Secret Chat : Whatsapp हे आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग झालाय. मेसेज असो, कॉलिंग किंवा व्हिडीओ कॉलिंग Whatsapp हा उत्तम ऑप्शन आहे. आता Whatsapp एक नवं प्रायव्हेट चॅटचं फिचर आणलंय. Whatsapp मध्ये हे नवं फिचर लवकरात लवकर येणार आहे.

या फिचरमुळे यूजर्सला कोणत्याही स्पेसिफिक चॅटला लॉक करता येणार आणि सीक्रेट चॅट युजर्सशिवाय कोणीच वाचू शकणार नाही. त्यामुळे या नव्या फिचर्सची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

कसं काम करणार हे नवं फिचर?

वॉट्सॲपपच्या या नव्या फिचरला ट्रॅक करण्यासाठी वेबसाइट WABetaInfo नुसार, एंड्रॉइडसाठी वॉट्सॲपचा नवा लेटेस्ट बीटा वर्जनमध्ये हे फीचर दाखवण्यात येणार. रिपोर्टनुसार Contacts किंवा ग्रुप इंफो स्क्रीनवर यूजर्स काही चॅट्स आणि ग्रुप्सला लॉक करू शकणार.

जेव्हा चॅट लॉक केली जाणार तेव्हा त्याच्या सेक्शनमध्ये ट्रांसफर केली जाणार आणि केवळ यूजर्सच्या फिंगरप्रिंट किंवा पासकोडवरुनच ही चॅट ओपन केली जाणार. त्यामुळे या सीक्रेट चॅटमुळे तुमची प्रायव्हसी अधिक स्ट्राँग होणार.

हे फिचर प्रोटेक्टेड चॅट मध्ये येणाऱ्या मीडिया फाइल्सला फोन गॅलरी मध्ये ऑटोमॅटिकली डाउनलोड होण्यापासून थांबवतं आणि प्रायवेट फोटो आणि व्हिडीओ दुसऱ्यांना दिसत नाही. सोबतच कोणी चॅट उघडण्याचा प्रयत्न करत असेल तर तो बघायच्या आधी चॅटला क्लिअर करायला सांगितले जाणार.

केव्हा लॉन्च केले जाणार हे फिचर
या फीचरला फ्यूचरमध्ये Whatsapp वर्जनमध्ये सहभागी करण्यात येणार. मात्र कंपनीकडून अद्याप कोणतीही रिलीज डेट देण्यात आलेली नाही. या फीचरला वॉट्सॲपआपल्या सेफ्टी फीचर्समध्ये सहभागी करणार जो यूजर्सला बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनसोबत ॲप लॉक करण्याची परवानगी देणार.

वॉट्सॲप सातत्याने नवे फीचर्स आणत असतो. वॉइस चॅट, एडिट मेसेज, शॉर्ट व्हिडियो मेसेज, डिसअपेयरिंग मेसेज आणि अन्य बरंच काही. Whatsapp प्लॅटफॉर्म हा जगभरातील फेमस सोशल मीडिया ॲप आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT