A man dressed as a fake tiger stands face-to-face with a real tiger — the viral video capturing this shocking moment has taken social media by storm.
esakal
Man Dresses as Tiger Faces Real Tiger Viral Video Shocks Internet : आजकाल कोण कधी काय करेल याचा काही नेम नाही. शिवाय, सोशल मीडियामुळे जगाच्या कानाकोपऱ्यातील घडामोडींचे फोटो अन् व्हिडिओ देखील आपल्याला घरबसल्या बघता येतात, त्यामुळे काही अजबगजब व्हिडिओ हे तुफान व्हायरल होत असतात. असाच एक अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
एक बहाद्दर वाघाचं कातडं पांघरून थेट मोकळ्या मैदानात फिरणाऱ्या वाघांसमोर जाऊन बसला.. त्या ठिकाणी दोन वाघ होते. त्यापैकी एक वाघ बसलेला होता, तर दुसरा वाघ हा फिरत होता. तितक्यात वाघाचं कातडं पांघरून आलेल्या या पठ्ठ्याला पाहून तो वाघ त्याच्या दिशेने आला.
सुरुवातीला या वाघाने हळूहळू येत नकली वाघाच्या तोंडाजवळ तोंड नेलं अन् दुसऱ्याच क्षणी त्याला हा नकली वाघ असल्याचे लक्षात आले आणि त्याने जोरदार पंजा मारून त्या नकली वाघाच्या तोंडावरचा मास्क खाली पाडला.
यानंतर मग नकली वाघ बनून आलेल्या त्या बहाद्दराने धूम ठोकली अन् त्याच्या मागे मग खरोखरचा वाघ लागला. हे दृश्य या व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर यावर आता कमेंटचाही पाऊस पडत आहे. तर अनेकजण हा व्हिडिओ शेअर देखील करत आहेत.
काहींच्यामते हा मूर्खपणा होता, तर काहींनी त्या पठ्ठ्याच्या हिंमतीला सलाम केला. तर काहींनी हा व्हिडिओ नकली असल्याचंही म्हटलंय. मात्र एकूणच या व्हिडिओतून वाघ हा हुशार प्राणी असल्याचंही समोर आलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.