Pimpalgaon Toll esakal
Trending News

Viral Video : पोलीस पत्नी आणि महिला कर्मचारी यांच्यात धरपकड, व्हिडीओ व्हयरल

नाशिकच्या पिंपळगाव टोलनाक्यावर दोन महिलांची फ्रीस्टाईल हाणामारी

सकाळ डिजिटल टीम

Viral Video : पिंपळगाव टोल नाका नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो. सध्या इथलाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हि़डीओ इतके शेअर केले जातात की तो आकडा पाहूनही आपण थक्क होतो. तर, काही व्हिडीओ वारंवार पाहिले जातात. सध्या एक असाच व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये नाशिकच्या पिंपळगाव टोलनाक्यावर दोन महिलांची फ्रीस्टाईल हाणामारी पाहायला मिळत आहे.

यात पोलीस पत्नी आणि महिला कर्मचारी यांच्यात पहिले शाब्दिक बाचाबाची आणि त्यानंतर झालेली फ्रीस्टाईल हाणामारी पाहायला मिळाली. नाशिकच्या पिंपळगाव टोलनाक्यावर दोन महिला आपापसात भिडल्या आणि आजुबाजूचे पाहतच राहिले. नेमकं काय चाललंय हेच अनेकांना कळेना. यावेळी CRPF पती देखील महिले सोबत होते.

टोल भरण्याच्या कारणावरून आधी वाद झाला आणि त्यानंतर या वादाचं हाणामारीत रूपांतर झालं. वाद इतका पेटेल याची कोणीच अपेक्षा केली नव्हती. पण, नेमकं तेच झालं, प्रवासी महिला आणि टोलनाक्यावरील महिला कर्मचाऱ्यामध्ये हाणामारी झाली. यावेळी त्या दोघीही एकमेकींना पूर्ण ताकदीनं मारत असल्याचं लक्षात आलं. हाणामारीचं कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.

टोलनाक्यांवर अनेकदा अशा प्रकारचे वाद पाहायला मिळतात. पण, महिलांमध्ये झालेल्या या हाणामारीची सध्या बरीच चर्चा सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT