dhule market committee
dhule market committee esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Market Committee Election : ‘लक्ष्मी’दर्शनाला पार्ट्यांसह पैठणीचा साज! मतदारांची चांदी...

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : काँग्रेस आणि भाजपचे प्रस्थापित नेते, आमदारकीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी धुळे तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम ठरली. त्यामुळे त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. (96 46 percent voting market committee election dhule news)

साहजिकच शुक्रवारी (ता. २८) मतदान प्रक्रियेवेळी काँग्रेस विरुद्ध भाजप-भदाणे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्यावर नियंत्रणासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. शिवाय पडद्याआड ‘लक्ष्मी’दर्शनासह किमती पैठणी, ओल्या पार्ट्यांच्या खैरातीमुळे मतदारांची चांदी झाल्याच्या चर्चेने तालुका ढवळून निघत आहे. मतदारांच्या दिमतीला बाउन्सर, वाहतुकीसाठी बस, आलिशान कार आदींमुळे ही निवडणूक जिल्ह्यात गाजते आहे.

निवडणुकीची प्रक्रिया २७ मार्चला सुरू झाल्यावर अर्ज स्वीकृती, छाननी, माघारी, अपिलांवर निवाडा आदी प्रक्रिया पार पडली. नंतर २१ एप्रिलला वैध उमेदवारांना चिन्हवाटप झाल्यावर प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली. एकूण १८ जागांसाठी ही निवडणूक होती.

व्यापारी व अडते मतदारसंघात भाजपचे महादेव परदेशी आणि काँग्रेसप्रणीत महाविकास आघाडीचे विजय चिंचोले बिनविरोध संचालक झाल्याने उर्वरित विविध मतदारसंघांच्या १६ जागांसाठी शुक्रवारी देवपूरमधील महाराणा प्रताप विद्यालय मतदान केंद्रात निर्धारित वेळेत ९६.४६ टक्के मतदान झाले. त्यात एकूण तीन हजार ५९० पैकी तीन हजार ४६३ मतदारांनी हक्क बजावत ३० उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद केले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

आठ ते नऊ कोटींची उलाढाल?

बाजार समितीवर पूर्वापार काँग्रेसची सत्ता असल्याने यंदा विरोधात भारतीय जनता पक्षासह बोरकुंड येथील प्रथम लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब रावण भदाणे गटाने हातमिळणी करत ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली.

काँग्रेसप्रणीत महाविकास आघाडीचे नेतृत्व करत आमदार कुणाल पाटील यांनी शेतकरी विकास पॅनल, तर भाजप-भदाणे गटाचे नेतृत्व करत खासदार डॉ. सुभाष भामरे, बाळसाहेब भदाणे यांनी परिवर्तन पॅनल दिले.

दोन्ही गटांनी मतदारांना लक्ष्मीदर्शनासह ओल्या पार्ट्या आणि किमती पैठणी देऊन खूश ठेवण्याचा प्रयत्न केल्याची, यातून तब्बल आठ ते नऊ कोटी रुपयांच्या उलाढालीची चर्चा धुळे तालुक्यात रंगते आहे.

कडे...बाउन्सर अन्‌ बस, कार

या पार्श्वभूमीवर अधिकाधिक मतदार आपल्या पारड्यात असावे यासाठी पाटील आणि भामरे-भदाणे गटाने कसोशीने प्रयत्न केले.

मतदान केंद्र परिसरात गटागटाने मतदार केंद्रापर्यंत आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करणे, बस, आलिशान कारमधून मतदारांना सुरक्षितपणे आणणे, ते एकमेकांच्या गळाला लागू नये म्हणून दोन्ही गटांकडून कार्यकर्त्यांचे कडे करून मतदारांना मतदान केंद्रस्थळी पोचविणे, शिवाय दिमतीला एका विरोधी गटाकडून, तर मोठ्या प्रमाणावर बाउन्सर उपस्थित ठेवणे आदी चित्र समोर आल्याने आगामी विधानसभा निवडणुकीची ही रंगीत तालीम म्हणून भाजप-भदाणे गट आणि काँग्रेसने बाजार निवडणुकीकडे पाहिल्याचे स्पष्ट झाले.

रविवारच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

मतदान केंद्रस्थळी उत्साही समर्थक कार्यकर्त्यांकडून आमदार कुणाल पाटील यांना घोषणाबाजीतून नेणे आणि त्याप्रमाणे पोलिसांनी भाजप-भदाणे गटाचे प्रमुख बाळासाहेब भदाणे यांना अडविणे यावरून दोन्ही गटांच्या समर्थकांमध्ये वादाची ठिणगी पडली. त्याचे पर्यवसान धक्काबुक्की, लोटालोटी झाल्यावर स्थिती नियंत्रणासाठी पोलिसांना लाठीमार करून जमाव पांगवावा लागला.

पोलिसांनी भाजप-भदाणे गटाला लक्ष्य केल्याचा आरोप करत उमेदवार गिरासे व कार्यकर्त्यांनी घटनास्थळीच ठिय्या आंदोलन सुरू केले. यातून मतदान प्रक्रियेला अडथळा निर्माण करू नये, अशी समज पोलिसांनी दिल्यावर ठिय्या आंदोलन रोखले गेले. अशा अटीतटीच्या लढतीमुळे धुळे तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय इमारतीत ३० एप्रिलला होणाऱ्या मतमोजणीसह निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

RCB vs CSK : पावसामुळे 5-5 किंवा 10-10 ओव्हरचा सामना झाला तर कसे असेल RCBचे गणित? जाणून घ्या समीकरण

Mallikarjun Kharge : ''राज्यात 'मविआ'ला कमीत कमी ४६ जागा मिळतील'' खर्गेंचा दावा; इंडिया आघाडीची पत्रकार परिषद

SCROLL FOR NEXT