उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : केंद्रात पुन्हा भाजप आल्यास सवलती अन् संविधान संपेल!

सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : स्वतंत्र भारतासाठी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी योगदान दिले, तसा देश केवळ काँग्रेसच चालवू शकतो. आता भाजपची सत्ता असली तरी देश चालविणे भाजपला शक्य नाही.

आज भाजपकडे पैसा असला तरी लोकशाहीत ही बाब विपरीत ठरते, हा पैसा कायमस्वरूपी टिकणार नाही, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार ॲड. के. सी. पाडवी यांनी केले. (Adv K C Padavi statement about bjp nandurbar news)

असली (ता. धडगाव) येथे काँग्रेसतर्फे अक्कलकुवा तालुक्यातील ७९, तर धडगाव तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींचे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा माजी मंत्री ॲड. पाडवी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

या वेळी जिल्हा परिषदेचे गटनेते तथा माजी सभापती रतन पाडवी, जिल्हा परिषद सदस्य सी. के. पाडवी, जान्या पाडवी, प्रताप वसावे, निर्मला राऊत, हिराबाई पाडवी, जितेंद्र पाडवी, रूपसिंग तडवी, माजी जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत, हारसिंग पावरा, रवींद्र पाडवी, डीडीसी बॅंकेचे माजी संचालक विक्रम पाडवी, विलास पाडवी, गोविंद पाडवी, माजी सभापती पिरेसिंग पाडवी, वाण्या वळवी, बिरबल पाडवी यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

काँग्रेससाठी वर्षानुवर्षे योगदान देणाऱ्या दिवंगत कार्यकर्त्यांना आदरांजली वाहण्यात आली. हा कार्यक्रम नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी सत्काराचा असला तरी याच वेळी नवनिर्वाचितांना विकासकामे राबविण्याबाबत उपयुक्त माहिती ‘यशदा’चे अधिकारी अशोक पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आली.

धनगरांविरुद्ध मी लढणार; डॉ. गावितांच्या भूमिकेबाबत उत्सुकता

धनगर घुसखोरीचा प्रश्न दिवसागणिक अवघड होत चालला आहे. आज राज्यात एक कोटी दोन ला‌ख धनगर आहेत. त्यांना आदिवासींच्या सवलती देण्यासाठी सर्वच पक्षांकडून पाठबळ मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीदेखील धनगर आदिवासी असल्याचे पत्र दिले आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

कुठलाही पक्ष, नेता धनगरांच्या बाजूने उभा राहत असला तरी मी स्वतः त्यांच्याविरुद्ध लढा उभारणार असल्याचे म्हणत आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना आजच विचारा, की धनगर आरक्षणाबाबत तुम्ही काय करणार, असे आवाहन उपस्थितांना केले.

रात्र वैऱ्याची; लढले तरच टिकणार!

धनगर आरक्षणाबाबत बोलताना माजी मंत्री ॲड. पाडवी यांनी परिस्थिती गंभीर होत चालली आहे. युवकांनी नुसतेच पक्ष, संघटनांमधील पदे घेऊ नयेत, लढा उभारला‌ पाहिजे. आज भाजप न्यायालयातूनच धनगरांना आदिवासींमध्ये आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे म्हणत लढले तरच आपला समाज टिकेल, असे सांगितले.

सातपुड्यात काँग्रेस पक्षप्रेम कायम

नंदुरबार जिल्हा राजकारणात अनेक पक्ष सक्रिय झाले असले, तरी गांधी परिवाराच्या मायेने (स्व. इंदिराजींचे प्रेम) वाढलेला जिल्हा असल्याने याच जिल्ह्याच्या सातपुड्यातील जनतेच्या हृदयावर पंजा (काँग्रेस) चांगलाच कोरला गेल्याचे आजच्या जनसमुदायावरून दिसून येते.

एवढेच नव्हे तर खोलवर रुजलेल्या इंदिरा मायेमुळे सातपुड्यात काँग्रेसला नव्या कार्यकर्त्यांची फारशी आवश्यकता नाही, जुन्याच कार्यकर्त्यांवर काँग्रेस भक्कमपणे उभी असल्याचेदेखील आजच्या उपस्थितीवरून दिसते.

ॲड. पाडवी यांच्या मनोगतातील प्रमुख मुद्दे

- एकदा तरी खासदार बनणार.

- आमदार नसलो तरी समाजकारण सोडणार नाही.

- राहुल गांधींसाठी लोकसभेत मतदान करा.

- पुढे सरपंच कार्यशाळा सुरू करणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bengal sports minister resigns : कोलकातामध्ये मेस्सीच्या कार्यक्रमात उडालेल्या गोंधळानंतर अखेर बंगालचे क्रीडामंत्र्यांनी दिला राजीनामा!

IPL 2026 Auction live : Mumbai Indians ची अन्य फ्रँचायझीकडून होतेय कोंडी! आकाश अंबानींच्या चेहऱ्यावर निराशा... Memes Viral

IPL 2026 Auction Live : राजस्थानमधील १९ वर्षीय पोराच्या डोक्यावर CSK ने ठेवला हात! मोजले तब्बल १४ कोटी; Who is Kartik Sharma?

द फॅमिली मॅन फेम अभिनेत्याची ड्रग तस्करी प्रकरणात तुरुंगात रवानगी; फिल्म इंडस्ट्रीतील ओळखीचा करत होता गैरवापर

Mumbai: आता ऑनलाइन अपॉइंटमेंट, आरोग्य माहिती आणि प्रमाणपत्रे एका नंबरवर मिळणार! बीएमसीकडून हेल्थ चॅटबॉट सेवा सुरू, नागरिकांना दिलासा

SCROLL FOR NEXT