Dhule News : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत शुभमंगल सामूहिक तसेच नोंदणीकृत विवाह योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सचिन शिंदे यांनी केले. (appeal to take advantage of Shubhmangal Mass Marriage Scheme dhule news)
महिला व बालविकास विभागामार्फत खुला प्रवर्ग व इतर मागासवर्गीय प्रवर्गातील एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या शेतकरी, शेतमजूर तसेच निराधार, विधवा, परित्यक्ता महिलांच्या केवळ दोन मुलींच्या विवाहासाठी शुभमंगल सामूहिक/नोंदणीकृत विवाह योजना राबविण्यात येत आहे.
अशी आहे योजना
शुभमंगल सामूहिक विवाह योजनाही जिल्ह्यातील नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थामार्फत राबविण्यात येत असून, विवाह करणाऱ्या जोडप्यास दहा हजार व सामूहिक विवाहाचे आयोजन करणाऱ्या संस्थेस जोडप्यामागे दोन हजारांचे अनुदान मिळते. संस्थेस योजना राबविताना किमान पाच व कमाल दहा जोडप्यांचा समावेश करण्याची परवानगी राहील.
संस्थेस वर्षातून दोनदाच सामूहिक विवाह घेता येतील. स्वयंसेवी संस्थेने पात्र लाभार्थ्यांची सर्व कागदपत्रे एकत्रित करून विवाहाच्या किमान एक महिना अगोदर सादर करणे आवश्यक राहील.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
विवाह सोहळ्यात भाग घेतलेल्या जोडप्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग व विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल.
प्रस्ताव सादर करा
नोंदणीकृत विवाह योजनेसाठी नोंदणीकृत विवाह करणाऱ्या खुला प्रवर्ग व इतर मागासवर्गीय दांपत्यांना या योजनेद्वारे दहा हजार रुपये लाभ मिळतो. ज्या जोडप्यांना फक्त नोंदणीकृत विवाह करावयाचा आहे, अशांनी सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होणे बंधनकारक नाही.
या योजनेसाठी ज्या नोंदणीकृत संस्था शुभमंगल सामूहिक विवाह योजना राबविण्यासाठी इच्छुक असतील, अशा संस्थांनी तसेच नोंदणीकृत विवाह करणाऱ्या खुले प्रवर्ग व इतर मागासवर्गीय दांपत्यांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, ५२ जयहिंद कॉलनी, सुधा हॉस्पिटलजवळ, देवपूर, धुळे येथे संपर्क साधावा. विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करून प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन श्री. शिंदे यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.