Pune Crime news  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Fraud Crime : नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची फसवणूक; खापर येथील घटना

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Fraud Crime : प्रॉपर्टी वादाची जमीन नावावरून करून देतो व नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून भिवंडी येथील एकाने खापर (ता. अक्कलकुवा) येथील तरुणाकडून पाच लाख २१ हजाराची रोख रक्कम उकळून फसवणूक केली.

संबंधित तरुणास ही बाब लक्षात आल्यावर त्याने अक्कलकुवा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर भिवंडीतील एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Cheating young man with lure of job nandurbar fraud crime news)

खापर (ता. अक्कलकुवा) येथील रहिवासी रोहित सुरेश कापुरे (वय २६) यांची वादग्रस्त जमीन आहे. ती नावावर करून देण्यासाठी तसेच, नोकरी लावून देतो असे आमिष दाखवीत भिवंडी येथील डॉ. दिनेश मंगल भोईल याने २१ जानेवारी ते ४ जून २०२३ असे सहा महिन्यात वेळोवेळी पाच लाख २१ हजार ४३ रुपये रोहित कापुरे या तरुणाकडून उकळले.

मात्र सहा महिन्यात ना त्याची वादग्रस्त जमीन नावावर केली नाही, त्याला नोकरी लावली. त्यामुळे कापुरे याने डॉ. दिनेश भोईर याच्याशी संपर्क साधत दिलेल्या रक्कमेची मागणी केली असता ती रक्कम देण्यास टाळाटाळ सुरू केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यावरून रोहित कापुरे यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अक्कलकुवा पोलिस ठाणे गाठून संबंधित घटनेची माहिती पोलिसांना दिली.

त्यानंतर रोहित कापुरे यांच्या फिर्यादीवरून भिवंडी येथील डॉ. दिनेश मंगल भोईर याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT