st bus malegaon.jpg 
उत्तर महाराष्ट्र

अन् सिग्नलवरच बसचे ब्रेक निकामी झाले..त्यानंतर....

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मालेगाव स्टॅन्ड येथील सिग्नलवर शहर बसचे ब्रेक निकामी झाले; परंतु चालकाने वेळीच बसचा वेग आटोक्‍यात आणत प्रसंगावधान दाखविल्याने मोठा अपघात टळला. किरकोळ अपघातात एका रिक्षाचालकासह दुचाकीस्वार जखमी झाले. अपघातामुळे बस भररस्त्यात तिरपी झाल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. 

अशी घडली घटना...

रविवारी (ता. 15) दुपारी पावणेचारच्या सुमारास ही घटना घडली. निमाणी बसस्थानकातून पंचवटी-कामटवाडे (लक्ष्मीनगर) ही बस (एमएच 15, एके 8086) निघाली असता, मालेगाव स्टॅन्ड येथे येताच बसचे ब्रेक निकामी झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. चालकाने तातडीने हॅंडब्रेक लावत बस सिग्नलच्या एका कोपऱ्यात वळविली. गर्दीच्या वेळी चालकाने दाखविलेल्या या प्रसंगावधानाने मोठा अपघात टळला. मात्र बस भररस्त्यात तिरपी झाल्याने बराच काळ वाहतुकीची कोंडी झाली. 

 ...अन्यथा मोठा अपघात 
बसचे ब्रेक नादुरुस्त झाल्याचे बसचालकाच्या वेळीच लक्षात आल्यावर त्याने पंचवटी कारंजाकडून मालेगाव स्टॅन्डकडे येणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूला, माठ व क्रॉकरी विक्रेत्यांच्या दुकानाकडील एका कोपऱ्यात बस वळवत तातडीने हॅंडब्रेक लावला. त्यामुळे बस प्रथम एका रिक्षा व नंतर दुचाकीवर धडकून कोपऱ्यात अडकली. ही बस रामकुंडाकडील उताराकडे गेली असती तर या ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्‍यता होती; परंतु चालकाने ऐन गर्दीच्या वेळी होणारा मोठा अपघात प्रसंगावधान राखत टाळला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway traffic jam : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी; खंडाळा बोगद्याजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा

Latest Marathi News Live Update : शिवजयंतीनिमित्त सिंहगड घाटात रांगोळीच्या पायघड्या

Sugar Factory : कारखाने वर्षभर सुरू ठेवण्यासाठी हालचाली, मल्टिफीडसाठी ६३ कारखान्यांचा पुढाकार

T20 WC, IND vs NED: ...अन् मोठा अनर्थ थोडक्यात टळला! सूर्यकुमार - रिंकू सिंगची जोरात धडक अन् चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला; Video

Chhatrapati Shivaji Maharaj:विदर्भभूमी शिवरायांच्या पदस्पर्शाने ६ वेळा पावन, आग्रा कैदेतून सुटल्यानंतर विदर्भातून प्रवास

SCROLL FOR NEXT