Central Reserve Police Force jawan Yogesh Birhade esaksal
उत्तर महाराष्ट्र

Soldier Death News : धुळ्यातील जवान बिऱ्हाडेंचे निधन : आज अंत्ययात्रा

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : धुळे शहरातील देवपूरमधील रहिवासी आणि जम्मू-काश्मीरमधील अंवतीपुरा (जि. पुलवामा) येथे कार्यरत केंद्रीय राखीव पोलिस दलातील जवान योगेश बिऱ्हाडे (वय ३८, रा. आनंदनगर, भोई सोसायटी) यांचे निधन झाले.

ही घटना गुरुवारी (ता. १८) येथे कळताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

जवान योगेश यांचा गोळी लागून मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्याचे वडील अशोक बिऱ्हाडे यांनी सांगितले. याबाबत मात्र जिल्हा प्रशासनाकडे कुठलीही माहिती गुरुवारी रात्री उशिरापर्यंत उपलब्ध झालेली नव्हती. (Death of Central Reserve Police Force jawan Yogesh Birhade from Dhule Funeral today incident in Pulwama Service in CRPF Dhule News)

योगेश बिऱ्हाडे यांची देवपूरमधील भोई सोसायटीतील निवासस्थानापासून शुक्रवारी (ता. १९) सकाळी नऊला अंत्ययात्रा निघेल. जवान बिऱ्हाडे यांच्या मागे पत्नी, चार वर्षांचा मुलगा आर्यन आणि सोळा महिन्यांची कन्या अवनी, निवृत्त शिक्षक वडील अशोक बिऱ्हाडे असा परिवार आहे.

जवान योगेश यांना बालपणापासूनच सैन्यात, पोलिस खात्यात भरतीची इच्छा होती. त्यासाठी ते दहावीपासून तयारी करीत होते.

बारावीनंतर केंद्रीय राखीव पोलिस दलात भरती झाले. प्रामाणिक सेवा बजावत असताना बुधवारी (ता. १७) सकाळी वडील अशोक बिऱ्हाडे यांना दूरध्वनीवरून जवान योगेश यांनी कायमचा निरोप घेतल्याची माहिती देण्यात आली.

त्याचा कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. ही माहिती देताना वडिलांनी भावनांना वाट करून दिली. बिऱ्हाडे मूळचे अमळनेर येथील आहेत. ते धुळे शहरात स्थायिक झाले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जवान योगेश २५ जानेवारी २००६ ला केंद्रीय राखीव पोलिस दलात भरती झाले. त्यांनी छत्तीसगड, मुंबई (तळोजा), जम्मू-काश्मीर, नांदगाव येथे सेवा बजावली आहे. सध्या ते जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सेवा बजावत होते.

नुकतेच ते धुळे येथे रजेवर आले होते. रजा संपल्यानंतर ५ मेस पुन्हा ड्यूटीवर गेले. यानंतर बुधवारी (ता. १७) सकाळी साडेअकराच्या सुमारास जवान योगेश यांनी घरी व्हिडिओ कॉल केला. ते पत्नी रामेश्वरी यांच्यासह मुलांशी बोलले होते.

जवान योगेश यांच्या निधनाचे वृत्त कळताच कुटुंबीयांनी आक्रोश केला. नंतर त्यांच्या घरी नातेवाइकांसह मित्रपरिवाराने गर्दी केली. सीआरपीएफ ड्यूटीतील जवान योगेश यांचा चार वर्षांचा कालावधी शिल्लक होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Gaming: PokerBaazi कंपनीचा शेअर कोसळला, 2 दिवसांत 20 टक्के घसरण; गुंतवणूकदारांचे 2,000 कोटी रुपये बुडाले

Viral Video: इंस्टा जाम, गुलाबी साडीत किन्नरचं सौंदर्य... सोशल मीडियावर धुमाकूळ, चक्क ६.२५ कोटी लोक झाले फिदा!

रोहितनंतर सूर्यकुमार यादवचीही विकेट पडणार? गौतम गंभीर 'लाडक्या'ला कर्णधार करणार

Maharashtra Latest News Update: इंडिया अलायन्सचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला

Video : तुम्हीपण असा डबा वापरता काय? बाबांनो, जेवणाचं होईल विष, धक्कादायक व्हिडिओ पाहा

SCROLL FOR NEXT