Crime Latest Marathi News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News | संशयित दरोडेखोरांची टोळी पकडली

शोध पथक गस्तीवर असताना त्यांना दुचाकीवर फिरणारे संशयित दिसले.

सकाळ वृत्तसेवा


शिरपूर (जि. धुळे) :
दरोड्याच्या तयारीत हत्यारांसह सज्ज असलेली दरोडेखोरांची टोळी शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने पकडली. संशयितांपैकी चौघांना जेरबंद करण्यात आले तर एक संशयित अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला. (Latest Marathi News)

२८ जुलैला मध्यरात्री अडीचला शहरातील करवंद रस्त्यावरील बालाजी नगर परिसरात ही कारवाई झाली. शोध पथक गस्तीवर असताना त्यांना दुचाकीवर फिरणारे संशयित दिसले. पोलिसांनी थांबण्याचा इशारा केल्यानंतर संशयितांनी दुचाकी सोडून अंधारात पळ काढला. मध्यरात्री पाच ते सात किमी अंतरापर्यंत पाठलाग करुन घेराव घालून पोलिसांनी चार जणांना पकडले. एकजण अंधाराचा फायदा घेऊन फरारी झाला. पकडलेल्या संशयितांना शहर पोलिस ठाण्यात नेण्यात आले.

संशयितांची झडती घेतली असता तलवार, लोखंडी कट्यार, लोखंडी उचकटणी, मोठी कटावणी, मोबाईल व तीन दुचाकी असा एकूण एक लाख १७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयितांकडे आढळलेल्या तिन्ही दुचाकी चोरीच्या असल्याचा संशय आहे. संशयितांमध्ये अत्तरसिंह मोहनसिंह भिल (वय २६), सफू मोहनसिंह भिल (वय २२, दोघे रा.नावेर ता.कुक्षी जि. धार, मध्यप्रदेश), साहेब लधू भिल (वय २२, रा.गेटा ता.कुक्षी), रवींद्र मानसिंह भिल (रा.नावेर ता.कुक्षी) यांचा समावेश आहे. संशयितांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक किरण बाऱ्हे तपास करीत आहेत.

बालाजीनगरातून दुचाकी लंपास
धुळ्याहून शिरपूरला आलेल्या सलून व्यावसायिकाची दुचाकी चोरीस गेल्याची घटना शहरातील बालाजी नगर येथे घडली. धुळे येथे केशकर्तनालय चालवणारे दत्तात्रय काशिनाथ महाले (वय ५५, रा.शांतिनगर, धुळे) २७ जुलैला कामानिमित्त शिरपुरात आले होते. त्यांची दुचाकी बालाजी नगरमध्ये पार्क केली होती. दुपारी साडेबारा ते दीडच्या दरम्यान अज्ञात संशयिताने हिरो एचएफ डीलक्स दुचाकी (एमएच १८ एएस ०५१९) चोरुन नेली. तिची किंमत २० हजार रुपये आहे. शहर पोलिस ठाण्यात अज्ञात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


अहिल्यापूर येथून युवतीचे अपहरण
अहिल्यापूर (ता.शिरपूर) येथून अल्पवयीन युवतीला पळवून नेल्याच्या संशयावरुन अज्ञात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अपहरणाची घटना २२ जुलैला सकाळी दहाला घडली. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या १७ वर्षे वयाच्या मुलीस अज्ञात संशयिताने पळवून नेले. मुलीचे कुटुंब मध्यप्रदेशातील रहिवासी असून सध्या कामानिमित्त अहिल्यापूर येथे राहत आहे. थाळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पिस्तूल बाळगल्याचा मृत युवकावर गुन्हा
गावठी पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या करणाऱ्या युवकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हर्षल भिका माळी (वय २६, रा.रामसिंह नगर, शिरपूर) असे मृताचे नाव आहे. १३ जुलैला रात्री अकराला त्याने रामसिंह नगर येथील राहत्या घरी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेतली होती. या घटनेत त्याचा मृत्यू झाला. घटनास्थळावरुन पोलिसांनी २० हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल व तिच्यातून झाडलेले काडतूस असा मुद्देमाल जप्त केला. हवालदार भरत चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मृत हर्षल माळी याच्याविरोधात अवैधरीत्या शस्त्र बाळगून त्याद्वारे आत्महत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक छाया पाटील तपास करीत आहेत.

वीजचोरीचा चौघांवर गुन्हा
वीज चोरी करताना पकडल्यावर दंड व अन्य रक्कम भरण्यास टाळाटाळ केल्यामुळे तऱ्हाडी (ता.शिरपूर) येथील चार जणांविरोधात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वीज वितरण कंपनीच्या वरुळ (ता.शिरपूर) येथील कक्षाचे सहायक अभियंता दिनेश माळी यांनी पोलिसांत फिर्याद दिली. सात जूनला श्री. माळी यांनी तऱ्हाडी गावात तपासणी केली असता चार जणांच्या घरात चोरुन वीज वापरली जात असल्याचे आढळले होते. त्यांनी मोजणी केल्यानंतर संशयितांनी एकूण आठ हजार ८०४ युनिट विजेची चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यांना दंड व वीजचोरीचे बिल असे एकूण ८३ हजार ३१० रुपये भरण्याचे आदेश देण्यात आले. मात्र विहित मुदतीत त्यांनी बिल भरले नाही. त्यामुळे शहर पोलिस ठाण्यात संशयित मंगलबाई दिलीप पाटील, मंगलबाई मुरलीधर पाटील, अशोक आत्माराम पाटील व मीराबाई पाटील (सर्व रा. तऱ्‍हाडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT