निजामपूर(ता.साक्री): येथील अँग्लो उर्दू हयस्कुलच्या प्रांगणात लोकसेवा वेल्फेअर फाउंडेशनतर्फे आयोजित मुस्लिम समाज सामुदायिक सोहळा
निजामपूर(ता.साक्री): येथील अँग्लो उर्दू हयस्कुलच्या प्रांगणात लोकसेवा वेल्फेअर फाउंडेशनतर्फे आयोजित मुस्लिम समाज सामुदायिक सोहळा 
उत्तर महाराष्ट्र

मुस्लिम समाजाचा सामुदायिक विवाह सोहळा...​

​प्रा. भगवान जगदाळे

​निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे): येथील लोकसेवा वेल्फेअर फाऊंडेशतर्फे नुकताच अँग्लो उर्दू हायस्कुलच्या प्रांगणात सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला. त्यात 10 जोडप्यांचे विवाह लावून देण्यात आले. प्रत्येक विवाहित जोडप्याला संसारोपयोगी साहित्यही देण्यात आले. प्रसिद्ध उद्योजक सरकारसाहेब रावल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी पिंपळनेर येथील समाजसेविका वजीराबी खाला यांचाही जाहीर सत्कार करण्यात आला.​ 

​नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. हिना गावीत, साक्रीचे आमदार डी. एस. अहिरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, साबीर शेख, हर्षवर्धन दहिते, जिल्हा परिषद सदस्या उषा ठाकरे, पंचायत समिती सदस्य वासुदेव बदामे, भाजपाचे तालुकाध्यक्ष संजय अहिरराव, सहाय्यक निरीक्षक दिलीप खेडकर, नाजीम शेख, हारून हलवाई, सविता जयस्वाल, रहमान शाह, याकूब पठाण, बलदार पठाण, बापू जगताप आदींची प्रमुख उपस्थिती होती. "अल्पसंख्याक समाजातील गरजूंसाठी अशा प्रकारचे विधायक उपक्रम राबविणे ही काळाची गरज असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ अल्पसंख्याक समाजापर्यंत पोचविण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करू," असे प्रतिपादन खासदार डॉ. हिना गावीत यांनी यावेळी बोलताना केले. उद्योजक सरकारसाहेब रावल, आमदार डी. एस. अहिरे, दोंडाईचाचे उपनगराध्यक्ष नबु पिंजारी आदींनीही मनोगत व्यक्त केले.​

​या सामुदायिक विवाह सोहळ्यात शबाना बानो (पालघर) व निसार अहमद (धुळे), शाहीस्ता परवीन (शहादा) व जुबेर शाह (ताहराबाद), मिराज पठाण (शिरपूर) व मेहबूब शेख (निजामपूर), सानिया बानो (तळोदा) व कय्युम शेख (जैताणे), हिना बी (निजामपूर) व मुद्दसर शाह (धुळे), नाजमीन बानो (नामपूर) व निसार शेख (सुरत), हिना बानो (नामपूर) व अख्तर शेख (उधना), हिना बानो (साक्री) व आरिफ महंमद (सेलंबा), रीना बानो (चिमठाणे) व जुबेर तांबोळी (साक्री), जरीना बी (जैताणे) व कासीम शाह (धरणगाव) आदी वधू-वरांचा समावेश होता. यातील काही वधू-वर हे अनाथ, विधवा व घटस्फोटित असेही होते. प्रत्येक वधू-वरासोबत दोनशे याप्रमाणे साधारण दोन हजार नातेवाईक, वऱ्हाडी व स्थानिक ग्रामस्थही कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.​

​अबरार शेख यांनी प्रास्ताविक केले. अयाज अहमद यांनी सूत्रसंचालन केले.​ ​ताहीरबेग मिर्झा यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लोकसेवा वेल्फेअर फाउंडेशनचे मार्गदर्शक ताहीरबेग मिर्झा, अध्यक्ष रफिक शेख, उपाध्यक्ष अश्फाक शाह, सचिव अबरार शेख, सहसचिव मोहसीन कुरेशी, खजिनदार रिजवान सिकलीकर, संचालक मोहसीन शाह, अल्ताफ कुरेशी, मुस्तकीम शाह, निहाल शेख, अकिल शाह, याकूब कय्युम, सल्लागार आसिफ मिर्झा, तय्यब अली, अब्दुल्ला शेख व बाजीराव पगारे आदींनी विशेष परिश्रम घेतले.​

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT