Superintendent of Police Sanjay Barkund and other officers, staff while giving last farewell to Schwan Prince of Crime Detection Department of District Police Force.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Police Dog : गुन्हेगार शोधणाऱ्या ‘प्रिन्स’ला अखेरचा निरोप; श्‍वानाच्या मृत्यूने अधिकारी, कर्मचारी गहिवरले

सकाळ वृत्तसेवा

Dhule Police Dog : जिल्हा पोलिस दलाच्या गुन्हे डिटेक्शन विभागातील श्‍वान ‘प्रिन्स’चा मंगळवारी (ता. १) पहाटे मृत्यू झाला. अनेक गुन्ह्यांचा माग काढणे, गुन्हेगारांना हुडकून काढणाऱ्या या प्रिन्सला शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला.

हवेत तीन राउंड फायर करून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी पोलिस अधिकाऱ्यांसह प्रशिक्षक भावुक झाले होते. आम्ही श्वान नाही तर एकप्रकारे अधिकारी गमावल्याची भावना पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी बोलून दाखविली. (dog Prince of crime detection department of district police force died dhule news)

प्रिन्स श्वान हा डॉबरमॅन जातीचा श्‍वान होता. किडनीची समस्या व ग्रॅस्ट्रोमुळे त्याचे पहाटे निधन झाले. पहाटे अडीचला पोलिस दलात वीर नावाचा श्वान दाखल झाला व पहाटे पाचला प्रिन्सने प्राण सोडला. प्रिन्स श्वान हा २०२१ मध्ये जिल्हा पोलिस दलात दाखल झाला. त्याला अडीच महिन्यांचा असताना पुणे येथून आणले होते.

तो अतिशय शांत आणि प्रेमळ होता. काम करण्याची त्यांची ताकदही मोठी होती. प्रिन्सला आणल्यानंतर प्रथम त्याला सहा महिने पोलिस कवायत मैदानावर प्रशिक्षण दिले. त्यानंतर त्याला शिवाजीनगर पुणे येथेही प्रशिक्षण देण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

प्रशिक्षण पूर्ण करत त्याला ४०० पैकी ३१८ गुण मिळाले होते. फेब्रुवारीत परत आल्यानंतर त्याला गुन्हे डिटेक्शन विभागात घेण्यात आले.

गुन्ह्यातील घटनास्थळी त्याला एखाद्या वस्तूचा वास दिल्यास तो तत्काळ माग काढत असे. त्याने अनेक गुन्ह्याचा माग दाखविल्याची माहिती श्वानहस्तक कैलास परदेशी व चंद्रशेखर माळी यांनी दिली. प्रिन्सला अखेरचा निरोप देतेप्रसंगी सहाय्यक पोलिस अधीक्षक हृषीकेश रेड्डी, एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, श्वानहस्तक श्री. परदेशी, श्री. माळी, एएसआय राजू जाधव, प्रशांत माळी, कमलेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT