onion market.jpg 
उत्तर महाराष्ट्र

एका दिवसात कांद्याला चक्क 'एवढा' भाव...शेतकऱ्याला सुखद धक्काच! 

बापूसाहेब वाघ : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सध्या ज्या शेतकऱ्यांकडे कांदा आहे त्यांना लाखाने पैसे मिळत आहेत. जळगाव नेऊर (ता. येवला) येथील शेतकरी नवनाथ बनकर यांना याची प्रचीती आली. अगोदर कटू अनुभवाचा सामना करीत घेतलेल्या निर्णयाने लाखभर रुपयांच्या फायद्याने सुखद धक्का दिला. 

तीन हजारांवरून थेट एवढा भाव?

शेतकरी नवनाथ बनकर यांनी शनिवारी (ता. 14) 20 क्विंटल कांदा विंचूर मार्केटमध्ये विक्री करण्यास नेला. पहिल्या रांगेत सरासरी पाच ते साडेपाच हजार रुपयांपर्यंत व्यापारी कांद्याचा लिलाव पुकारत होते. श्री. बनकर यांच्या कांदा असलेल्या ट्रॅक्‍टरजवळ बोली लावण्यास व्यापारी आले तेव्हा फक्त तीन हजार रुपये भाव मिळाला. यामुळे श्री. बनकर नाराज झाले. किमान पाच हजार रुपये भाव मिळावा, अशी अपेक्षा होती. शेवटी श्री. बनकर यांनी लिलाव झालेला कांदा व्यापाऱ्याला न देता ट्रॅक्‍टर घरी आणून उभा केला. सोमवारी (ता. 16) तोच कांदा विंचूर मार्केटमध्ये विक्रीस आणला. लिलावात सात हजार 651 रुपये भाव मिळाल्याने 20 क्विंटल कांद्याचे एक लाख 54 हजार 550 रुपये आले. खर्च वजा जाता एक लाख 54 हजार 365 रुपये हाती आले. शनिवारी तीन हजार रुपये भावाने कांदा विक्री केला असता, तर फक्त 60 हजार रुपये हाती आले असते. मात्र, श्री. बनकर यांनी घेतलेला निर्णय सार्थकी लागल्याने एक दिवसात त्यांना 94 हजार 500 रुपयांचा फायदा झाला. 

अगोदर नाराज होतो..पण अचानक

विंचूर मार्केटमध्ये शनिवारी कांदा विक्रीस आणला. पहिल्या रांगेत सरासरी पाच ते साडेपाच हजार रुपयांपर्यंत भाव होता. दुसऱ्या रांगेत अचानक भाव कमी झाला. माझ्या कांद्याला तीन हजार रुपये दर मिळाल्याने नाराज होऊन कांदा घरी आणला. सोमवारी त्याच 20 क्विंटल कांद्याला सात हजार 651 रुपये दर मिळाला. एक लाख 54 हजार 550 रुपये मिळाले. - नवनाथ बनकर, जळगाव नेऊर, कांदा उत्पादक शेतकरी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War: इराण-इस्रायलच्या लढाईत भारताला फटका! चार दिवसांत मोठं आर्थिक नुकसान, धक्कादायक आकडेवारी समोर

IND vs ENG: चंद्रग्रहणात सराव... नको रे बाबा! भारतीय संघाने वानखेडेवरील सरावाची वेळ बदलली, सूर्याच्या संघाने 'ती' वेळ टाळली

Drunk and Drive Crime : ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ विरोधात मोहीम! तीन दिवसांत ३०१ मद्यपी चालकांवर कारवाई

Latest Marathi News Live Update: खार स्टेशनजवळ दोन इसम चालत्या ट्रेनमधून पडले

Baba Venga Prediction : इराण–इस्रायल–अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर बाबा वेंगा यांची भविष्यवाणी चर्चेत

SCROLL FOR NEXT