woman harrasment 1.jpg 
उत्तर महाराष्ट्र

मी लेकरांना घेऊन तीन दिवसांपासून मंदिरात बसलीय..मी तक्रार करणार नाही, फक्त आम्हाला घरात घ्या...

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून घराबाहेर काढलेल्या पीडित महिलेला दारोदार फिरण्याची वेळ आली आहे. पीडित महिला उच्चशिक्षित असून, तिचे माहेर टिटोळा (जि. ठाणे) येथे आहे. तीन दिवसांपासून थंडीत उघड्यावर दोन चिमुरड्यांना घेऊन मंदिराच्या व्हरांड्यात ही महिला बसली आहे. नवरा पुण्याला असून, तो घरात घेत नाही. माझ्या कुटुंबीयांविरोधात पोलिस तक्रार दाखल करणार नाही. मात्र मला घरात घ्या, अशी आर्त हाक ती देत आहे. 

उच्चशिक्षित पीडित महिलेची आर्त हाक 

संबंधित महिलेने शुक्रवारी (ता.13) "सकाळ' कार्यालयात दुपारी दूरध्वनीवरून आपली कैफियत मांडली. मला माझे पती, सासू, सासरे घरात घेत नाही. कृपया मदत करा, असे तिने सांगितले. त्यानंतर घोटीच्या "सकाळ' प्रतिनिधीने वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात कळविले असता, पीडित महिला कुटुंबीयांविरोधात तक्रार दाखल करणार नसल्याचे ठाणे अंमलदारांनी सांगितले. हा वाद दोन्ही बाजूंच्या नातेवाइकांना बोलावून मिटवला जाईल, असे सांगण्यात आले. मात्र नातेवाईकही वादात पडण्यास तयार नसल्याचे समजते. शेवटी पोलिसपाटील मधुकर धांडे यांनी तिला आपल्या घरी आश्रय दिला. मात्र पुढे काय? म्हणून पीडित महिला न्यायासाठी मदत मागत आहे. याप्रकरणी पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांना कळविण्यात आले असता, आम्ही सहकार्य करण्याच्या दृष्टीने पावले टाकत आहोत, असे त्यांनी सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Government Land: पुणे जिल्ह्यात शासकीय जमिनींचा शर्तभंग; ३३० प्रकरणे उघड, ३५० कोटींच्या ३० ते ४० जागा शासनजमा

1980s चा ट्रेंड फॉलो केला... पण तेव्हाचा हा वादळी राजकीय किस्सा वाचा... सत्ता, पराभव, जेल अन् इंदिरा गांधींचं कमबॅक

Maharashtra Cooperative Bank: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ठेवींना मोठा फटका; वर्षभरात ६,३५० कोटींची घट, एनपीए ८.४४ टक्क्यांवर

US Open: झ्वेरेव सलग चौथ्यांदा ग्रँडस्लॅमच्या सेमीफायनलमध्ये; फायनलच्या तिकिटासाठी कोणाविरुद्ध होणार लढती?

Engineering Student: आजी, मम्मी, पप्पा... सॉरी!’ अभियांत्रिकीच्या २२ वर्षीय विद्यार्थ्याने संपवले जीवन; ‘छोटीला चांगले शिकवा...’ अशी चिठ्ठी

SCROLL FOR NEXT