Suspected accused, Assistant Police Inspector Shrikrishna Pardhi, police team and staff etc. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : शेतातील मोटरचोर जेरबंद; पिंपळनेर पोलिसांची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News :येथील पोलिस ठाणे तपासपथकाने चोरीस गेलेल्या शेतातील शेतकऱ्यांचे, विहिरीतील तसेच पांझरा नदीतील इलेक्ट्रिक जलपरी, मोटर, कॉपर केबल वायर चोरी करणाऱ्या चोरांना ऐंशी हजारांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले. अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.( Farm motor thief arrested dhule crime news)

पिंपळनेर पोलिस ठाणे व आजूबाजूच्या ग्रामीण परिसरातून शेतातील विहिरीतील जलपरी इलेक्ट्रिक मोटरपासून ते स्विच बोर्ड (मोटरपेटी)पर्यंत असलेल्या कॉपर केबल वायर व मोटरचोरीचे प्रमाणे वाढल्याने शेतकरी त्रस्त झाले होते.

पिंपळनेर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी गस्त वाढविली असता ७ ऑक्टोबरला दुपारी अकरानंतर ते ८ ऑक्टोबरला पहाटे पाचपूर्वी साक्री तालुक्यातील देगाव व मलाजन गावाच्या शिवारातील काही शेतकऱ्यांची शेलोरी नदीकिनारी असलेल्या जलपरी, मोटर चोरीस गेल्याचे समजला.

त्या अनुषंगाने सोमवारी (ता. ९) पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने श्री. पारधी त्यांच्या शोधपथकातील अधिकारी भूषण शेवाळे, बी. एम. मालने, विश्वेश हजारे, रवींद्र सूर्यवंशी, सोमनाथ पाटील, प्रवीण धनगर, नरेंद्र माळी, पंकज वाघ यांनी काकासट भिलाटी येथील संशयित आरोपी किरण यादू सोनवणे (वय २१) यास ताब्यात घेऊन विचारपूस केली.

त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याने भाऊ विठ्ठल यादू सोनवणे (२६) व अर्जुन यादू सोनवणे (फरारी) व पिंपळनेर परिसरातील वडारवाडी परिसरातील त्याचे मित्र सुनील वामन बागूल (२२), संजय बाबूलाल आकले (३६), दादा नवल्या माळी (२४) यांनी एकत्र मिळून गुन्हा केल्याचे समजले. पाचही संशयितांना ताब्यात घेतले आहे. विचारपूस केली असता त्यांनी यापूर्वीदेखील गांगेश्वर महादेवर मंदिर, म्हसदी परिसरात चोरी केल्याचे कबूल केले. त्यांच्या ताब्यातून मुद्देमाला जप्त करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

दुर्दैवी घटना! 'सख्ख्या काकाच्या पिकअपखाली सापडून चिमुरड्याचा मृत्यू'; आंबेगाव तालुक्यातील घटना, कुटुंबीयांचा आक्रोश

INDW vs PAKW सामन्यात वाद! पाकिस्तानी फलंदाज विकेटनंतरही मैदान सोडेना, कर्णधाराचीही अंपायरसोबत चर्चा; भारताचं मात्र सेलिब्रेशन

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

SCROLL FOR NEXT