Accident esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Accident News : नेरला भीषण अपघात; कंटेनरच्या धडकेत दुचाकीचालकासह मुलगी जागीच ठार

सकाळ वृत्तसेवा

Dhule Accident News : येथील सुरत-नागपूर य राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर सुरतकडून नागपूरकडे येणारा अवजड मालवाहतूक कंटेनर (एनएल ०१, एई ७७७०) व नेर येथील दुचाकी (एमएच ४१, एएच ५५७९) यांचा भीषण अपघात झाला. यात दुचाकीचालक पित्यासह चिमुरडीचा मृत्यू झाला, तर एक महिला जखमी झाली.

दुचाकीस्वार देवा भिल (वय अंदाजे ४२), भटाबाई श्रीराम सूर्यवंशी (वय अंदाजे ६६), पूनम छोटू माळीच (वय अंदाजे १४) हे महालकाळी शिवारात वास्तव्यास होते. (girl along with bike rider died on spot in accident with container dhule accident news)

ते बाजारासाठी नेर येथे आले होते. घरी परतीच्या मार्गावर असताना रस्ता ओलांडताना राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव येणाऱ्या मालवाहतूक कंटेनरने त्यांना ओढत नेले.

यात दुचाकीचालक देवा भिल, मुलगी पूनम माळीच जागीच ठार झाले. वृद्ध भटाबाई श्रीराम भिल गंभीर जखमी झाल्या. त्यांना धुळे येथील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले आहे. कंटेनरचालक फरारी आहे.

ग्रामस्थांकडून रास्ता रोको

मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणारा कर्ता देवा भिल यांचा मृत्यू झाल्यामुळे आदिवासी कुटुंबाला तत्काळ आर्थिक मदत मिळावी यासाठी ग्रामस्थांनी सलग तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. जिल्हा पोलिस उपअधीक्षक साजन सोनवणे, धुळे तालुका पोलिस निरीक्षख प्रमोद पाटील तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अभियंता निखिल महाले हेदेखील घटनास्थळी पोचले. येथील ग्रामस्थांनी मृत कुटुंबाच्या मदतीची मागणी केली. तसेच गंभीर जखमी भटाबाई भिल यांना आवश्यकता असल्यास खासगी रुग्णालयात उपचार करण्याची हमी घेतली. अभियंता महाले, उपअधीक्षक सोनवणे यांनी मृत देवा भिल, पूनम माळीच यांच्या कागदपत्रांची पूर्तता करून आदिवासी कुटुंबाला मदतीचे, शासकीय मदतीचे आश्वासन दिले.

आश्वासनानंतर ग्रामस्थांनी मृतदेह रुग्णवाहिकेत टाकून शासकीय हिरे महाविद्यालयात नेण्याची परवानगी दिली. रस्ता सुरळीत मोकळा करून देण्यासाठी ग्रामस्थांनी मदत केली. अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी नेर येथील जिल्हा परिषद सदस्य आनंद पाटील, सामाजिक कार्यकर्ते, दीपक खलाणे, देवीदास माळी, डॉ. सतीश बोडरे, नामदेव बोरसे, गोकुळ श्रीराम, अनिल सूर्यवंशी, अमोल खैरनार, सिद्धांत गुजराथी, सुनील भिल, दीपक मोरे, रवी मोरे आदी उपस्थित होते.

रुग्णवाहिकेअभावी जखमी मुलीचा मृत्यू

तासभर संपर्क करूनही रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. ती उपलब्ध झाली असती तर पूनम माळीच हिचे प्राण वाचले असते. मृत्यूचा थरार पाहून नेर गावातील ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT