Bharat Salunkhe  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime : दप्तरात फेरफार केल्याने ग्रामपंचायत लिपिकास अटक

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime : येथील ग्रामपंचायत लिपिक भरत साळुंखे याने नमुना नंबर आठ दप्तरात फेरफार करून स्वतःचा फायदा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन तपासाअंती त्याला अटक करण्यात आली.

भरत याचा गैरव्यवहार उघडकीस आल्यावर त्याला कायमस्वरूपी निलंबित करून त्याच्याविरोधात फिर्याद देण्यात आली होती. (Gram Panchayat Clerk arrested for tampering with records dhule crime)

लिपिकाने पदाचा गैरवापर करून ग्रामपंचायतीची पूर्वसंमती न घेता नमुना नंबर आठमध्ये स्वतःच्या फायद्यासाठी परस्पर फेरफार करून बनावट सही व शिक्का मारून गैरव्यवहार केल्याप्रकरणी लिपिक भरत भिला साळुंखे (रा. घोडमाळ, सामोडे) या कर्मचाऱ्याविरुद्ध तत्कालीन ग्रामविकास अधिकारी बाजीराव जगताप यांनी २५ मार्चला पिंपळनेर पोलिसांत फिर्याद दिली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्हाची नोंद करण्यात आली होती. तपासाअंती भरत साळुंखे यास अटक करून साक्री न्यायालयात हजर करण्यात आले.

न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. दुसऱ्या दिवशी न्यायालयाने त्याचा जामीन नाकारून त्याला जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT