Crime News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : सोनगीरला अवैध जनावरांची वाहतूक; वाहनासह संशयित ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : जनावरांची निर्दयपणे वाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनाला येथील पोलिसांनी शनिवारी (ता. १७) रात्री दीडला पकडले.

देवभाने फाट्याजवळ संशयित वाहन दिसले. त्याचा पाठलाग करत धुळ्यातील अवधान टोलप्लाझाजवळ पकडण्यात आले. याप्रकरणी एका संशयितास अटक करण्यात आली आहे. ३१ हजारांच्या जनावरांसह तीन लाख मुद्देमाल असलेले वाहन जप्त करण्यात आले. (Illegal transportation of animals to Songir Three actions in three days Suspect in custody along with vehicle Dhule News)

सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश फड व सहकारी पेट्रोलिंग करीत असताना देवभाने (ता. धुळे) फाट्याजवळ संशयित पिकअप वाहनचालकाला (जीजे २७ बीएल २४१८) थांबण्याचा इशारा केला असता त्याने वाहन भरधाव वेगाने धुळ्याकडे दामटले.

पोलिसांनी पाठलाग करून शनिवारी दीडच्या सुमारास अवधान टोलनाक्यावर वाहनाला ताब्यात घेतले. चालक अकबरअली अजीम पेमला (रा. मुलतानपुरा मंदसोर, मध्य प्रदेश) याच्याविरोधात सोनगीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अमरिश सानप तपास करीत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पोलिसांनी बुधवारी (ता. १४ ) आयशर ट्रक (एमएच ०४ जेयू ६७५७) पकडून २० जनावरांची सुटका केली. त्यांची किंमत एक लाख नऊ हजार व वाहन १० लाख असा ११ लाख नऊ हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला.

गुरुवारी (ता. १५) चारचाकी वाहन (आरजे २७ ए ७८७८) पकडून २६ हजाराचे जनावरे व दोन लाख ५० हजाराचे वाहन मिळून दोन लाख ७६ हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. वाहन चालक जाबीर मोहम्मद हुसेन व अन्य तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिस अधीक्षक संजय बारकुंड अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश फड, नाईक अमरिश सानप, सूरज साळवे, किरण पारधी व नितीन जाधव यांनी कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT