Officials and representatives of various parties participating in the meeting of the India group at the district level.  esakal
उत्तर महाराष्ट्र

BJP Vs INDIA Group News : जिल्ह्यात भाजपविरोधात ‘इंडिया’ एकजूट! जिल्हा पातळीवर ‘इंडिया गटा’ची प्रथमच बैठक

सकाळ वृत्तसेवा

BJP Vs INDIA Group News : आपापसातील मतभेद विसरून भाजपच्या भ्रष्टाचारी व हुकूमशाहीविरोधात एकत्रित लढू, जिल्ह्यातील सर्व निवडणुकादेखील एकत्रितपणे लढवू, असा निर्णय तथा निर्धार स्थानिक पातळीवर ‘इंडिया’ गट तथा महाविकास आघाडीने बैठकीत केला.

धुळे महापालिकेच्या कारभाराविरोधात विराट मोर्चा काढण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्रात स्थानिक जिल्हा पातळीवर प्रथमच इंडिया गटाची बैठक झाल्याचा दावाही गटातर्फे करण्यात आला. (india and maha vikas aghadi decide to compete against bjp together dhule news)

धुळे जिल्हा पातळीवरील इंडिया गट तथा महाविकास आघाडीची बैठक १५ ऑगस्टला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित भोसले यांच्या देवपूर भागातील कार्यालयात झाली. शिवसेना (उबाठा), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, संभाजी ब्रिगेड आदी पक्षांचे पदाधिकारी, प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. श्री. भोसले यांनी प्रास्ताविक केले.

ते म्हणाले, की जिल्ह्यात सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर व शिवसेना (उबाठा) पक्षाचे माजी आमदार शरद पाटील यांनी भाजपची सत्ता असलेल्या महापालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद तथा नगर परिषद अशा सर्व ठिकाणी एकत्र येऊन भाजपच्या भ्रष्टाचार व हुकूमशाहीविरोधात एकत्र काम करू.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. एल. आर. राव, आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष हितेश पवार, संभाजी ब्रिगेडचे हेमंत भडक, शिवसेना (उबाठा) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे यांनीही मनोगत व्यक्त करून मार्गदर्शन केले. बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

भाजपच्या एकाधिकार, हुकूमशाही व भ्रष्टाचाराविरोधात एकत्र लढणे, जिल्हा व तालुका पातळीवर ‘इंडिया’ गटाची बांधणी करून बैठका घेणे, जिल्ह्यातील यापुढील सर्व निवडणुका, महापालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, सहकारी निवडणुका एकत्रित लढविणे, सर्वांमध्ये समन्वय साधण्यासाठी सर्व पक्षांची एक कमिटी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील व्यापक स्वरूपाची बैठक घेण्याचेही ठरले.

आमदार पाटलांकडे नेतृत्व

बैठकीत धुळे जिल्हा इंडिया गटाचे नेतृत्व आमदार कुणाल पाटील यांनी करावे, असा प्रस्ताव शिवसेना (उबाठा) पक्षाचे सहसंपर्कप्रमुख महेश मिस्तरी यांनी ठेवला. तसेच इंडिया गटातील सर्व पक्षांतर्फे धुळे महापालिकेतील भाजपच्या भ्रष्ट कारभाराविरोधात विराट मोर्चा काढण्याचेही ठरले. बैठकीत आपापल्या पक्षाची भूमिका पदाधिकारी, प्रतिनिधींनी मांडली. आपापसातील मतभेद विसरून समन्वय साधण्याचे ठरले.

काँग्रेसचे धुळे शहर-जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल भामरे, प्रदेश सरचिटणीस युवराज करनकाळ, मनपातील माजी विरोधी पक्षनेते साबीर शेठ, मुकेश खरात, शिवसेना (उबाठा) पक्षाचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, महानगरप्रमुख डॉ. सुशील महाजन, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, ग्रामीण जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे, प्रवीण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे धुळे शहर-जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, अल्पसंख्याक आघाडीचे राष्ट्रीय खजिनदार जोसेफ मलबारी, शिंदखेडा तालुकाध्यक्ष डॉ. कैलास ठाकरे, शिरपूर तालुकाध्यक्ष रमेश करनकाळ, धुळे शहर विधानसभा अध्यक्ष गोरख शर्मा, पदवीधरांचे प्रदेश उपाध्यक्ष जितू पाटील, धुळे तालुक्याचे विनोद बच्छाव, उपाध्यक्ष रईस काझी, व्हीजेएनटी आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजू डोमाळे, दत्तू पाटील, गुलाब पाटील, आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष हितेश पवार, कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. एल. आर. राव, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे पोपटराव चौधरी, संभाजी ब्रिगेडचे हेमंत भडक, श्याम निरगुडे, समाजवादी पक्षाचे ॲड. इमरान शेख आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance : आरोग्य विम्यावर ‘जीएसटी’चा भार; सर्वसामान्यांचे बिघडतेय आर्थिक गणित

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : महाराष्ट्रापुढील सर्व संकटे दूर करण्याची शक्ती पांडुरंगाने द्यावी- देवेंद्र फडणवीस

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT