leopard attack esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Leopard News : बिबट्याकडून बैल फस्त; वन्यपशूंची भक्ष्यासह पाण्यासाठी भटकंती

सकाळ वृत्तसेवा

Dhule Leopard News : येथील चिंचखेडे रस्त्यावरील काकोर शिवारात बिबट्याचे दर्शन नित्याचे झाले आहे. दररोज कुत्र्याची सहा पिल्ले फस्त करत दहशत निर्माण केली आहे, तसेच नांद्रे (ता. धुळे) येथील खरदडी शिवारात सोमवारी (ता. ९) रात्री बिबट्याने बैलावर हल्ला करत फस्त केले.

ऐन रब्बी पेरणीच्या काळात सुमारे ७० हजारांचा बैल ठार झाल्याने आता रब्बी पेरणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यापुढे उभा आहे.(leopard attacked on bull dhule leopard news )

सर्वत्र खरीप हंगामाची लगबग सुरू असताना वन्यपशूंचा दिवसेंदिवस धोका वाढत असून, शेतकरी, शेतमजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काकोर शिवारात बिबट्याचा मुक्त संचार आहे. मात्र वन विभाग नामानिराळा राहत असल्याचे चित्र आहे.

आता प्रत्येक घटना, प्रसंग वन विभागास किती वेळा सांगाव्यात व कळवाव्यात, असा प्रश्न शेतकऱ्यापुढे आहे. खरिपातील तृणधान्य पिकाची कापणी सुरू असून, उभ्या पिकात दबा धरून बसणारे बिबटे सैरभैर झाले आहेत.

वन विभागाचा दावा फोल..!

वन्यपशू बिबट्या लहान (शेळी, मेंढी, कुत्रा, वासरू, पारडू) प्राण्याची शिकार करत असल्याचा वन विभागाचा दावा नांद्रे शिवारातील घटनेवरून फोल ठरला आहे. कारण बिबट्या सहज शिकार होणाऱ्या लहान प्राण्यांवर हल्ला करत असल्याचे यापूर्वीच्या घटनेवरून दिसून आले आहे.

कारण लहान प्राणी बचावासाठी प्रतिकार करत नसल्याने बिबट्यास हल्ला करणे सोपे जात असल्याची माहिती वन विभागाच्या सूत्रांनी दिली. मोठा प्राणी मात्र बिबट्याला जवळदेखील येऊ देत नसल्याची माहिती दिघावे (ता. साक्री) येथील एका प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्याने दिली. असे असताना नांद्रे (ता.जि. धुळे) खरदडी शिवारात बिबट्याने किसन उत्तम खैरनार यांच्या बैलावर हल्ला करत फस्त केले आहे.

बिबट्याची जोडी असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बैल ठार झाल्याचे दिसून आल्यावर धुळे तालुका वन विभागाच्या कार्यालयास माहिती दिल्यावर वनकर्मचाऱ्यांनी पंचनामा केला. रब्बी पेरणी कशी करावी अशी काळजी किसन उत्तम खैरनार यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.

कोरड्याठाक पाणवठ्यांमुळे वन्यपशू सैरभैर

यंदा आरंभापासूनच वरुणराजाची धुळे जिल्ह्यावर अवकृपा राहिली आहे. केवळ भीजपावसावर खरीप हंगाम तग धरून होता. विहिरींनी आजपासून तळ गाठला असून, रब्बी पेरणी होईल की नाही अशी परिस्थिती आहे. दुसरीकडे ऐन पावसाळ्यात वनक्षेत्रातील पाणवठे कोरडेठाक आहेत.

उन्हाळ्यात भयावह चित्र असणार आहे. ऑक्टोबर हीटमुळे तापमानाचा पारा वाढत आहे. वाढते तापमान आणि कोरड्याठाक पाणवठ्यांमुळे वन्यपशू सैरभैर झाले आहेत. वनक्षेत्रातील कोणत्याच पाणवठ्यात पाणीच नसल्याची माहिती खुद्द वनकर्मचाऱ्यांनी दिली. भविष्यात पशु-पक्ष्यांचे वास्तव्यही धोक्यात येऊ शकते.

बिबट्याचे दिवसा दर्शन

एरवी भक्ष्यासाठी वनवन भटकंती करणारे वन्यपशू यंदा प्रथमच लवकर शेतशिवारात दिवसादेखील दर्शन देत असल्याची माहिती चिंचखेडे रस्त्यावरील काकोर शिवारातील अनेक शेतकऱ्यांनी दिली. काकोर शिवारात रात्रीच्या वेळी बिनधास्त फिरणारा बिबट्या दिवसाही दर्शन देत असल्याची चर्चा आहे.

वन्यपशूच्या हल्ल्यात फस्त झालेल्या मृत जनावरांचा पंचनामा केला, तर शासन तोकडी भरपाई देत असले तरी दीर्घ प्रतीक्षेनंतरच. शिवाय वेळेवर सर्वांनाच‌ नुकसानभरपाई मिळण्याची सुतराम शक्यता नसते. दिवसा शेतात थांबावे की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT