bridge course bridge course
उत्तर महाराष्ट्र

शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी ब्रिज कोर्स

शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी ब्रिज कोर्स; राज्यातील सर्व शाळांना बंधनकारक

जगन्नाथ पाटील

कापडणे (धुळे) : राज्यात प्राथमिक शाळा १५ महिन्यांपासून बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान (Student school online education) मोठ्या प्रमाणात होत आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळा सुरू होताच एक नवीन ब्रिज कोर्स (School new bridge course) शिकावा लागणार आहे. राज्यातील सरकारी आणि खासगी शाळेतील दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभाग ब्रिज कोर्स तयार करीत आहे. (dhule-all-school-Bridge-courses-compulsory-compensate-for-academic-losses)

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) ब्रिज कोर्सचा अभ्यासक्रम तयार करीत आहे. शैक्षणिक, मानसिक व सामाजिक दृष्टिकोनातून ब्रिज कोर्सचा अभ्यासक्रम तयार होत आहे. कोरोनामुळे २०२०-२१ पासून शाळा बंद आहेत. १५ महिन्यांपासून विद्यार्थी शाळेपासून दुरावले आहेत. यंदा शाळा सुरू झाल्यानंतर अभ्यासक्रम सुरू करण्यापूर्वी प्रत्येक शाळेला ब्रिज कोर्स पूर्ण करण्याच्या सूचना शिक्षण विभाग देणार आहे. ब्रिज कोर्सच्या अभ्यासक्रमासाठी शिक्षकांचे विषयनिहाय गट तयार केले आहेत.

गणित, विज्ञानवर अधिक भर

सलग दुसऱ्या वर्षी १५ जूनपासून राज्यात शैक्षणिक वर्ष सुरू होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, ऑनलाइन माध्यमातून ब्रिज कोर्सपासूनच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सुरवात होणार आहे. या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी तिसरीत असेल, तर ब्रिज कोर्स दुसरीच्या पाठ्यक्रमावर असेल. शाळा बंद असून, ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादा असल्याने विद्यार्थ्यांना ज्या संकल्पना स्पष्ट झालेल्या नाहीत, पण ज्याच्याशिवाय पुढील अभ्यासक्रम शिकता येणार नाही, असे महत्त्वाचे विषय ब्रिज कोर्समध्ये आहेत. प्रत्येक विषयाचा ब्रिज कोर्स वेगळा असणार आहे. गणित आणि विज्ञान या दोन विषयांवर अधिक भर दिला जाणार आहे.

पंचेचाळीस दिवसांचा कोर्स

ब्रिज कोर्स ४५ दिवसांचा असणार आहे. पुढील वर्गात प्रवेश करताना विद्यार्थ्याला मागील वर्षाच्या संकल्पना स्पष्ट झाल्या आहेत का, हे तपासण्यासाठी किंवा त्या अधिक प्रभावीपणे शिकविण्यासाठी हा ब्रिज कोर्स मदत करणार आहे. हा कोर्स शिकविल्यानंतरच विद्यार्थ्यांना चालू इयत्तेतील अभ्यासक्रम शिकविता येणार आहे. सुरवातीला शिक्षकांना विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा स्तर काय आहे, याची चाचपणी करण्याच्या सूचना आहेत. ब्रिज कोर्स शिकविल्यानंतर विद्यार्थ्यांना अपेक्षित क्षमता प्राप्त झाल्या आहेत की नाही, हेही शिक्षकांना पाहावे लागणार आहे.

सर्व शाळांसाठी बंधनकारक

ब्रिज कोर्स सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित, विनाअनुदानित, खासगी अशा सर्व शाळांसाठी असणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या प्रत्येक शैक्षणिक व्यवस्थापनाला ब्रिज कोर्स शिकविण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात येणार आहेत. मराठी, गणित, सामाजिकशास्त्र, अशा प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र ब्रिज कोर्स असणार आहे. दरम्यान, ऑनलाइन शिक्षणात अनेक मर्यादा आहेत. विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोचलेले नाही. शाळा सुरू झाल्यानंतर थेट अभ्यासक्रम शिकविण्यापेक्षा शैक्षणिक नुकसान झालेली पोकळी भरून काढण्यासाठी ब्रिज कोर्स मैलाचा दगड ठरणार असल्याचे चर्चिले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parental Welfare Law : आई-वडिलांना वाईट वागणूक देणाऱ्या कर्मचाऱ्यांची आता खैर नाही, पगारही कापला जाणार अन्...

भाजप ZP, पंचायत समितीसाठी उमेदवार कसे शोधणार? स्ट्रॅटेजी ठरली, ज्येष्ठ नेत्यांवर मोठी जबाबदारी

Latest Marathi News Live Update : मनसेच्या गोरेगावमधील मेळाव्याला थोड्याच वेळात सुरुवात

गैरकारभाराविरोधात दिव्यांगांचा लढा! सहकार खात्यातील न्यायासाठी ६ वर्षांपासून संघर्ष

Daily Horoscope: आज इंद्र योगाचा शुभ संयोग! कर्क, मकरसह 'या' 5 राशींवर हनुमानाची राहील विशेष कृपा

SCROLL FOR NEXT