उत्तर महाराष्ट्र

काम करण्यास परवानगी द्या..मिस्तरी, फर्निचरचे कारागीर घरी बसून 

सकाळवृत्तसेवा

जळगाव : फर्निचरचे काम करणारे, बांधकामावर सेंट्रीग काम करणाऱ्यांचे हातावर पोट असते. रोज मजुरी करायची, शनिवारी आठवड्याचा पगार घ्यायचा, बाजार करायचा अन्‌ त्यावर संसाराचा रहाटगाडा चालवायचा असा त्यांचा क्रम असतो. महिन्याभरापासून लॉकडाउनमुळे अशी कामे करणाऱ्यांना कामे करण्यास बाहेर पडता येत नाही. किती दिवस घरात राहणार? शासनाने एकतर आम्हाला कामावर जाऊ द्यावे अन्यथा वेतन द्यावे, अशी मागणी सेंट्रींगचे कामे करणारे मिस्तरी, फर्निचर कारागीरांची आहे. 

क्‍लिक कराः PHOTO कॅरम, बुद्धिबळ खेळून कंटाळलात...मग आता हे खेळ खेळा 

शासनाने वेतन द्यावे 
सचिन रामदास मिस्तरी ः लॉकडाउन सुरू झाल्यापासून हाताला काम नाही. घरची जबाबदारी माझ्यावर असल्याने कुटुंबांचे पोट कसे भरावे, असा प्रश्‍न आहे. फर्निचरचे काम करून मी उदरनिर्वाह करतो. रेशनवरील धान्य किती दिवस पुरणार. हाताला काम मिळाले, की रोजीरोटीचा प्रश्‍न सुटेल. एक महिना होत आला आता शासनाने फर्निचरचे काम करणाऱ्यांना लॉकडाउनमधून सूट देण्यात यावी. आम्ही अनेक कामगार आहोत, जे हातावर पोट भरतात. नोंदणीकृत बांधकाम कामगारांनाच शासन मदत देईल. फर्निचरचे काम करणाऱ्यांची त्यात नोंद नाही. त्यामुळे आम्हाला शासनाने सरसकट वेतन अथवा मदत द्यावी. 

कामगार, कारागीरांचा विचार करा 
रमेश बाविस्कर (मिस्तरी) ः आम्ही बांधकामावर सेंट्रींगची कामे करतो. महिना भरापासून हाताला काम नाही, घरी बसून आहोत. काम मिळाले, तर पोटापाण्याची सोय होते. आमच्यासह अनेक बांधकाम मजुरांचे हातावर पोट असते. शासनाने याचा विचार करावा. आम्ही सोशल डिस्टन्स पाळू. मात्र, आम्हाला काम करण्यास परवानगी द्यावी. 

फर्निचरची कामे करू द्यावी 
अमोल जाधव ः लॉकडाउनमुळे आमच्या कुटुंबांची परवड होतेय. कुटुंबांतील सदस्यांना आठ ते दहा दिवस पुरेल एवढे धान्य घरात होते, ते आता संपले. केशरी कार्डधारकांना धान्य मिळत नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, हे समजत नाही. शासनाने किमान आम्हाला रोजची मजुरी करण्यासाठी सूट द्यावी. आम्ही गर्दी न करता कामे करू. 

महिन्यापासून मजुरी बंद 
सुपडू मिस्तरी ः फर्निचर बनविण्यासाठी दुसऱ्याच्या हाताखाली काम करावे लागते. आठ दिवस काम केल्यानंतर मजुरी मिळते. ती आता महिनाभर झाले बंद झाली आहे. घरातील वस्तू आता संपण्याच्या मार्गावर आहेत. आतातरी शासनाने आम्हाला कामासाठी साइटवर जाऊ द्यावे. कुटुंबीयांचा उदरनिर्वाह, ज्येष्ठांची काळजी, आगामी काळात मुलांच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च कसा करू, याची चिंता लागून आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Local Body Election: स्थानिक निवडणुकांत भाजपचा झंझावात येणार! 'साम'चा एक्झिट पोल जाहीर; कुणाला किती जागा मिळणार? वाचा...

Asha Movie Collection: रिंकू राजगुरूच्या 'आशा'ला प्रेक्षकांची पसंती; सिनेमाने पहिल्या दिवशी किती केली कमाई?

BMC Election: मुंबईतील भाजपचा 'हा' अभेद्य किल्ला ठाकरे बंधू जिंकणार का? मारवाडी, गुजराती आणि जैन मतदारांच्या हाती निर्णय

Latest Marathi News Live Update: सटाणा शहरात बनावट चलनाचा प्रकार उघडकीस

Pune News : “दुचाकीची चेन साफ करताना अंगठा तुटला; पाच तासांच्या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांचा चमत्कार!

SCROLL FOR NEXT