Dhule Marathon News
Dhule Marathon News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Marathon News : धुळेकरांसाठी रविवारी निरायम आरोग्योत्सव!

सकाळ वृत्तसेवा

धुळे : शहरातील बसस्टॅण्डजवळील पोलिस परेड ग्राउंडवर रविवारी (ता. ५) प्रथमच होणाऱ्या जिल्हास्तरीय मेगा इव्हेंट अर्थात महामॅरेथॉन स्पर्धेसाठी राज्यातील अनेक स्पर्धकांसह धुळेकरांनी तुफान प्रतिसाद देत गुरुवारी (ता. २) नोंदणीची संख्या तब्बल २० हजारांवर नेली.

त्यामुळे ‘फिट धुळे... हिट धुळे’ हे घोषवाक्य सार्थ ठरवत रविवारी निरामय आरोग्योत्सव साजरा करण्याचे आयोजक आणि स्पर्धकांनी ठाणल्याचे स्पष्ट आहे. नोंदणीकृत स्पर्धकांना स्पर्धेत हमखास सहभागासाठी पोलिस ग्राउंडवर शनिवारी (ता. ४) नंबरसह टी-शर्टचे वाटप होईल. (Marathon Competition Registration twenty thousand Distribution of T Shirts with numbers on Saturday at Police Ground Dhule News )

मॅरेथॉन स्पर्धेसाठी जिल्हा पोलिस प्रशासनातर्फे अधीक्षक संजय बारकुंड यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत दानशूर, पोलिस दल, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महापालिका, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय आणि माध्यम प्रायोजक ‘सकाळ’ माध्यम समूह ही स्पर्धा यशस्वितेसाठी सरसावला आहे.

तीन किलोमीटर कुटुंबासाठी धाव (फॅमिली रन), पाच किलोमीटर (ड्रीम रन), दहा किलोमीटर, तसेच २१ किलोमीटर अशा गटात स्पर्धा आहे. पोलिस ग्राउंड, बारापत्थरमार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला वळसा घालून पुढे सर्व गटांसाठी आग्रा रोडवरून मोठ्या पुलामार्गे दत्तमंदिर चौक, जिल्हा क्रीडासंकुल, गोंदूरपर्यंत विविध टप्प्यांत चार गटांतील स्पर्धक निकषानुसार अंतरावर त्यांना गटनिहाय निम्म्या अंतरानंतर ‘यू टर्न’साठी कमानी व विशेष पथक असेल. तेथून पोलिस ग्राउंडपर्यंत त्यांची गटनिहाय निर्धारित अंतराची धाव पूर्ण होईल. तेथे विजेते निश्‍चित होतील.

हेही वाचा :'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

रिपोर्टिंगचा टाइम पहाटे पाच

या पार्श्वभूमीवर पोलिस ग्राउंडवर स्पर्धेच्या तयारीसह नियोजनाची बैठक झाली. पोलिस अधीक्षक संजय बारकुंड अध्यक्षस्थानी होते. निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपअधीक्षक हृषीकेश रेड्डी, प्रदीप मैराळे, मनपा उपायुक्त विजय सनेर, जिल्हा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार प्रमुख पाहुणे होते.

वर्किंग कमिटीतील जिल्हा रुग्णालयाचे डॉ. संजय शिंदे, पोलिस अधिकारी शिवाजी बुधवंत, हेमंत पाटील, योगेश राजगुरू, धीरज महाजन, श्रीकांत पाटील, आशिष अजमेरा, आशिष पटवारी, दीपक अहिरे, संदीप अग्रवाल, संग्राम लिमये, डॉ. राहुल बच्छाव, निखिल सूर्यवंशी, मनपाचे इतर अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. पोलिस ग्राउंडवरील रविवारच्या स्पर्धेसाठी पहाटे पाचला स्पर्धकांनी रिपोर्टिंग करायचे आहे. नंतर बिनचूकपणे सकाळी सहाला स्पर्धेस सुरवात होईल. यासह बैठकीत महत्त्वाचे इतर निर्णय झाले. स्पर्धकांना सहभागासह सहकार्याचे आवाहन श्री. बारकुंड यांनी केले.

टी-शर्ट, नंबरवाटप, स्पर्धेच्या वेळा

स्पर्धेसाठी पोलिस ग्राउंडवर शनिवारी (ता. ४) सकाळी दहा ते सायंकाळी सात या वेळेतच मोफत टी-शर्टचे वाटप होईल. नोंदणीकृत स्पर्धकांनाच टी-शर्ट व स्पर्धक क्रमांक (चेस्ट नंबर) वाटप होईल. लॅपटॉपद्वारे नोंदणीची पडताळणी केली जाईल. त्यासाठी स्पर्धकांनी एखादे ओळखपत्र जवळ बाळगावे. पोलिस ग्राउंडवरून रविवारी हिरवी झंडी दाखविल्यानंतर बिनचूकपणे सकाळी सहाला २१ किलोमीटर, सकाळी सव्वासहाला १० किलोमीटर, सकाळी साडेसहाला पाच किलोमीटर आणि सकाळी सातला तीन किलोमीटरचे स्पर्धक धावतील.

ते निर्धारित मार्गाने पुन्हा पोलिस ग्राउंडवर येतील. नंतर ग्राउंडवर आल्यावर रिफ्रेशमेंट काउंटर (२७ स्टॉल) असलेल्या ठिकाणी स्पर्धकांना आकर्षक मेडल व रिफ्रेशमेंटचा बॉक्स दिला जाईल. त्यात दोन सुरती कचोरी, गूळ- शेंगदाण्याची चिकी, एनर्जी ड्रिंक, पाण्याची बाटली असेल. टी-शर्टासह मेडल, रिफ्रेशमेंट बॉक्स मोफत दिला जाईल. शिवाय जिल्हा परिषदेमार्फत असलेल्या बचतगटांच्या स्टॉलवर अल्पदरात खाद्यपदार्थ, विविध उत्पादने स्पर्धकांना खरेदी करता येतील, असे पोलिस अधीक्षक बारकुंड, श्री. काळे, श्री. पवार यांनी सांगितले.

‘सेल्फी पॉइंट’मुळे आनंदमेळाच

विविध स्पर्धकांसह फॅमिली रनमधील कुटुंबाला पोलिस ग्राउंडवर असलेल्या निरनिराळ्या प्रकारच्या आकर्षक २० सेल्फी पॉइंटवर छायाचित्रे काढता येतील. २१ किलोमीटरवरील स्पर्धक ग्राउंडवर परतल्यानंतर लागलीच पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम सुरू होईल. विजेत्यांवर रोख पारितोषिकांचा वर्षाव, देखणा करंडक, तसेच सहभागी प्रत्येक स्पर्धकाला ई-प्रमाणपत्र दिले जाणार आहे. पोलिस प्रशासनाच्या आयोजनातून होणाऱ्या या उपक्रमातून पोलिस ग्राउंडवर आनंदमेळाच भरल्याची अनुभूती घेता येणार आहे. जिल्ह्यात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर स्पर्धा होत असल्याने पोलिस, महसूल, जिल्हा परिषद, महापालिका प्रशासन आणि वर्किंग कमिटी तयारीत गुंतली आहे.

खड्डे बुजविण्यासह मनुष्यबळ देणार

मॅरेथॉन मार्गावर खड्डे बुजविण्याची जबाबदारी महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने उचलली आहे. त्यानुसार काम सुरू केले जात आहे. स्पर्धेच्या मार्गावर स्पर्धकांच्या सुरक्षिततेसाठी दुतर्फा तीन तासांसाठी बॅरिकेड्स लावली जातील. महापालिकेतर्फे स्वच्छता पथक, रोटरी क्लब व रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉस रोडतर्फे पोलिस ग्राउंडवरील नियोजन केले जात आहे. मदतीला विविध संघटना व दिवाणमळा (ता. धुळे) येथील वॉटर पार्कमधील तरुणांचे पथक स्वयंसेवक असतीस. ठिकठिकाणी माहितीचे दिशादर्शक फलक असतील. महापालिकेतर्फे दोनशेहून अधिक कर्मचारी मदतीसाठी तत्पर असतील, असे आयुक्त देवीदास टेकाळे, उपायुक्त विजय सनेर यांनी सांगितले.

"धुळे पोलिस दलाच्या आयोजनातून होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी, स्पर्धकांना प्रोत्साहित करण्यासाठी उपस्थित राहणार आहे. ‘फिट धुळे...हिट धुळे’ होण्यासाठी सर्वच नोंदणीधारक स्पर्धकांनी अवश्‍य सहभागी व्हावे व धुळ्याचे आरोग्य व फिटनेसमधील नाव अधिक उंचवावे यासाठी आवाहन करीत आहे. महिलांसह कुटुंबीयांनी, अन्य स्पर्धकांनी आयोजकांचे नियोजन चांगल्या सहकार्यातून सफल करावे."

-विजय चौधरी, महाराष्ट्र केसरी, सहाय्यक पोलिस आयुक्त, पुणे

"प्रत्येकाला निरोगी, सुदृढ आरोग्य लाभावे, असे वाटते. त्यामुळेच त्यांना फिट राहण्यासाठी व धुळ्याचे नाव हिट होण्यासाठी मॅरेथॉन स्पर्धा होत आहे. तिला प्रत्यक्ष सहभागातून भरभरून प्रतिसाद द्यावा. तरुण-तरुणी, कुटुबांसह खेळाडूंनी अधिकाधिक संख्येने आवर्जून सहभागी होत आयोजकांच्या पाठीवर थाप द्यावी व धुळ्याचे नाव रोशन करावे. मी स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धेस्थळी उपस्थित राहीन."

-मृणाल गायकवाड, सौंदर्य सम्राज्ञी, ब्रॅन्ड ॲम्बेसेडर, धुळे महामॅरेथॉन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT