Dhule News : खानदेशात कापडणे स्वातंत्र्य सैनिकांचे गाव म्हणून नावलौकिक प्राप्त आहे. येथील तरुणाई हा लौकिक आजही टिकवून आहेत. दोनपेक्षा अधिक युवक सैन्यदलात आहेत.
दरवर्षी आठ ते दहा युवक सैन्यदलात भरती होतात. (More than 2 youths are in army from kapadne village dhule news)
आता पोलिस भरतीतही पाच युवक पात्र ठरले आहेत. ही तरुणाई देशसेवेचा वसा आजही टिकवून आहेत. ही अभिमानाची बाब आहे असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
येथील कापडणे विविध कार्यकारी शेतकरी सेवा सोसायटीने पोलिस भरतीत पात्र पाच युवकांचा गौरव सोहळा ठेवला. त्यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांनी युवकांसह गावाबद्दल स्तुतिसुमने उधळली.
सोसायटीचे अध्यक्ष राजा पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी उपाध्यक्ष अभिमन माळी, संभाजी बोरसे, उद्यानपंडित नथ्थू माळी, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नवल पाटील, आदर्श कन्या शाळेचे सचिव स्वप्नील भदाणे, साहित्यिक रामदास वाघ, माजी सरपंच भटू पाटील, उज्ज्वल बोरसे, अनिल माळी, शरद पाटील, दिनकर माळी, रवींद्र पाटील. विश्वास पाटील, सुनील पाटील, यशवंत खैरनार, दत्तू माळी, ग्रामपंचायत सदस्य हरीश पाटील, अमोल बोरसे, प्रवीण पाटील, हिंमत चौधरी, आसाराम माळी आदी उपस्थित होते.
दरम्यान पोलिस भरतीत पात्र ठरलेले विनायक नामदेव खैरनार, नीलेश संतोष पाटील, मुंजेश किशोर शिरसाठ, दीपक जगदीश पाटील व विजय गंगाराम खलाणे यांचा सन्मान झाला. जगन्नाथ पाटील यांनी सूत्रसंचालन केले. दीपक काटे यांनी प्रास्ताविक केले. उमाकांत पाटील यांनी आभार मानले.
नथ्थू माळी यांचा भूमिपुत्र सन्मान
विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष तथा उद्यानपंडित नथ्थू माळी यांचा भूमिपुत्र पुरस्काराने सन्मान झाला. माळी यांना शासनाने वीस वर्षांपूर्वी उद्यानपंडित पुरस्काराने सन्मान केले होते. त्यांनी मुरमाळ जमिनीत द्राक्ष व बोर फळशेतीचा प्रयोग यशस्वी केला होता. त्यानंतर जिल्ह्यात फळबागायतीचे क्षेत्र वाढले होते. त्यांचे विकास सोसायटीच्या प्रगतीतही मोठे योगदान आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.