Vijaykumar Gavit
Vijaykumar Gavit esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar: फोरमच्या मुखवट्याआडून गावित कुटुंबीय टार्गेट! डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंटच्या स्थापनेनंतर जिल्ह्यातील राजकारणाला फोडणी

धनराज माळी

Nandurbar: जिल्हानिर्मितीच्या २५ वर्षांनंतरही पाहिजे तसा विकास झाला नाही, त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन नंदुरबार डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरमची संकल्पना मांडली.

तिला प्रतिसाद देत राजकीय नेत्यांना एका मंचावर निमंत्रित करीत जिल्ह्याच्या विकासाचे व्हिजन मांडले गेले. ही नक्कीच स्वागतार्ह बाब आहे. (Nandurbar District Development Forum targeting only vijaykumar gavit family emerged political news)

मात्र मंचावर विकासाचे व्हिजन मांडण्याच्या मुख्य संकल्पनेपेक्षा आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित व खासदार डॉ. हीना गावित म्हणजेच एकंदरीत डॉ. गावित कुटुंबीयांच्या कार्यकर्तृत्वावरच आक्षेप घेत त्यांचा समाचारच अधिक घेतला गेला.

जणू काय त्यांच्यावर तोंडसुख घेण्याची नामी संधीच उपस्थितांना मिळाल्याचे चित्र होते. त्यामुळे नंदुरबार डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरमचा मुखवट्याआडून गावित कुटुंबीयांनाच टार्गेट केले गेल्याचे चित्र उभे राहिले आहे.

निकटवर्तीयांकडूनच फोरमची स्थापना

एकेकाळी डॉ. विजयकुमार गावित यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे शहाद्याचे युवा नेते तथा शहादा बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील, सारंगखेड्याचे जयपालसिंह रावल यांनी नंदुरबार डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरमची संकल्पना मांडली. त्यांनी शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी, माजी मंत्री ॲड. के. सी. पाडवी, जयकुमार रावल, ॲड. पद्माकर वळवी.

आमदार राजेश पाडवी, आमदार शिरीषकुमार नाईक, सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष दीपक पाटील, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी, किरसिंग पाडवी यांनीही स्वयंस्फूर्तीने सहभागी होत सकारात्मक निर्णय घेतला.

नंदुरबार डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरमची संकल्पना खरोखरच अभिनंदनीय आहे. ती मांडताना त्यांनी गट-तट, पक्ष, वादविवाद विसरून सर्वांनी जिल्ह्याच्या विकासाचे व्हिजन आखावे, ते तडीस न्यावे यासाठी सार्वजनिक प्रयत्न करावा, त्यात सर्वसामान्य जनतेलाही सहभागी करून घ्यावे, या उद्देशातून आपणच आपल्या जिल्ह्याचे शिल्पकार हे ब्रीदही तयार केले.

विकासाचे व्हिजन ठरवून अत्यंत चांगले विकासाचे मुद्दे, योजना, त्याचे फलित, बेरोजगारी, औद्योगिक विकास, स्थलांतर, कुपोषण, सिकलसेल, रस्ते, सिंचन, पर्यटन यासह अनेक मुद्द्यांचे मायक्रो प्लॅनिंग तयार केले गेले. त्याचे निमंत्रण सर्वांना दिले गेले. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केले गेले.

मात्र जर का सर्वपक्षीय फोरम आहे तर जिल्ह्याचे मंत्री डॉ. विजयकुमार गावित, खासदार डॉ. हीना गावित, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, आमदार आमश्या पाडवी यांना कुठे स्थान दिले गेले नाही. त्यावरून या फोरमविषयी एक ना अनेक चर्चांना उधाण आले.

त्यात सर्वत्र डॉ. गावित कुटुंबीयांना टार्गेट करण्यासाठी तर हा फोरम नाही ना अशी शंका व्यक्त होऊ लागली. मात्र हा विषय काहींनी पॉझिटिव्ह, तर काहींनी निगेटिव्ह घेतला. काहींना प्रत्यक्ष कार्यक्रमाची प्रतीक्षा होती.

विरोधासाठी नव्हे, तर विकासासाठी..!

शेवटी मुहूर्तमेढीसाठी रविवारचा मुहूर्त आला आणि एकदाचे सर्वपक्षीय एका मंचावर येत चर्चाही रंगली. प्रास्ताविकात गावित कुटुंबीयांचे नाव न घेता मुख्य प्रवर्तक अभिजित पाटील यांनी हा फोरम कोणाच्या विरोधात नाही तर जिल्‍ह्याच्या विकासासाठी आहे. डॉ. गावित कुटुंबीयांनी निमंत्रण नसल्याच्या चर्चेविषयी बोलताना ते देणारे आहेत, आम्ही मागणारे आहोत.

म्हणून आमच्या रांगेत त्यांना बोलावणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केले. जर तसे आहे तर मागणाऱ्यांना देणाऱ्याची गरज असणे तेवढेच स्वाभाविक आहे. शेवटी सत्तेच्या कारभारात ते आहेत. विकासासाठी निधी शेवटी शासनाकडूनच मागणार आहेत. तेव्हा शासन शेवटी त्यांच्या लोकप्रतिनिधींना विश्‍वासात घेतीलच.

एकीकडे पक्ष, मतभेद विसरून विकास करायचा म्हणतात तर गावित कुटुंबीय विकासाला बाधा आणत आहेत का, हाही प्रश्‍न उपस्थित होतो. त्यानंतर मनोगत व्यक्त करताना प्रत्येकाने विकासाच्या गप्पा सोडून डॉ. गावित कुटुंबाला विरोध करणारे मुद्दे अधिक मांडले. ते नको आहेत तर त्यांच्याविरोधात बोलण्यापेक्षा विकासावरच मंथन होणे अपेक्षित होते.

एकंदरीत प्रत्येकाच्या मनोगतातून डॉ. गावित कुटुंबीयांचे राजकारण संपविण्याचे संकेतच स्पष्ट मिळत होते. त्यामुळे नंदुरबार डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरमच्या मुखवट्याआडून गावित कुटुंबीयालाच टार्गेट केले गेल्याची चर्चा सर्वसामान्यांमध्ये जोरदार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT