20 casualties from cylinder leaks nashik news 
नाशिक

Gas Leakage: सिलिंडर गळतीतून 20 बळी; गांभीर्यता नसल्याने घटनांमध्ये वाढ

सकाळ वृत्तसेवा

Gas Leakage: शहर-जिल्ह्यात सिलिंडर गळतीमुळे अपघातांची संख्या वाढत आहे. हिवाळा सुरू झाल्याने या काळात गॅसचा वापर वाढतो. साहजिकच अपघाताची शक्यता वाढते. तीन वर्षांत २० बळी गेलेल्या या सिलिंडर गळतीबाबत प्रत्येक कुटुंबात गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

प्रत्येक कुटुंबात सिलिंडरचा वापर अनिवार्य झाला आहे. महिन्याला किमान २० लाखांहून अधिक घरगुती सिलिंडरचा वापर होणाऱ्या जिल्ह्यात त्याचा वापर नित्याचा अविभाज्य भाग बनला. सिलिंडरच्या वापरात गंभीरपणा कमी होत असल्याने अपघात वाढत आहेत. (20 casualties from cylinder leaks nashik news)

गेल्या तीन वर्षांत अनेक अपघात होऊन २० जणांचे बळी गेले. अनेक जण भाजल्याने जखमी झाले. त्यामागे सिलिंडर गळती हे प्रमुख कारण येते. पण, सिलिंडर गळती होते कशी, याबाबत अनेक कुटुंबांनी माहिती घेतली पाहिजे, असे गॅस कंपन्यांचे म्हणणे आहे.

कुटुंबात सिलिंडर वापर होत असेल तर प्रत्येक सदस्याच्या सुरक्षेसाठी त्या कुटुंबात काळजी घेतली गेली पाहिजे. त्यासाठी घरी सिलिंडर घेऊन येणाऱ्या डिलिव्हरी बॉयकडून ते घेताना सिलिंडरचे ‘सील’ काढून रेग्युलेटर लावून तपासणी करून घ्यायला हवी. गॅस गळती होते का, हे तपासून घेतले तरी बरेच अपघात कमी होतील. रात्री झोपण्यापूर्वी किंवा कामांसाठी परगावी जाताना सिलिंडरचे रेग्युलेटर बंद केले पाहिजे.

दर पाच वर्षांनी प्रत्येक कुटुंबाने शेगडीची आणि गॅस नळीची तपासणी करून घ्यायला हवी. सुरक्षा नळी बदलली पाहिजे. मात्र, हेच होत नाही. वर्षानुवर्षे लोक तपासणी करीत नाहीत. जादाचे अतिरिक्त सिलिंडर घरात असावे म्हणून भरलेले सिलिंडर साठवले जाते. पण, डिलिव्हरी बॉयकडून सिलिंडर घेताना त्याचे ‘सील’ काढून रेग्युलेटर लावून ‘लीक’ आहे की नाही, हे तपासण्याची तसदी घेतली जात नाही.

प्रतिदिन ४० हजार

नाशिक शहर-जिल्ह्यात एकट्या भारत पेट्रोलियमचे दिवसाला ४० हजार सिलिंडर घरोघर वापरले जातात. एका महिन्याला २० लाखांच्या आसपास सिलिंडरचा वापर होणाऱ्या शहर-जिल्ह्यात सिलिंडरच्या वाहतुकीसाठी १५० हून अधिक दुकानांतून सिलिंडर वाहतुकीच्या गाड्या अशी मोठी व्यवस्था आहे.

सिलिंडरच्या गुदामापासून तर वाहतूक आणि प्रत्येक घरातील वापरापर्यंत प्रत्येक टप्प्यात त्याची गळती हा कळीचा मुद्दा असतो. नियमित भाग म्हणून सिलिंडर वापराबाबत विशेष काळजी घेतली जात नाही. त्यातून अपघात वाढत असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

हे कराच...

- घरी येणारे सिलिंडर तपासा

- झोपण्यापूर्वी रेग्युलेटर बंद करा

- पाच वर्षांनी एकदा तपासणी करा

- बाहेरगावी जाताना रेग्युलेटर बंद ठेवा

"सिलिंडरचा वापर हा प्रत्येक कुटुंबाचा नित्याचा भाग बनला आहे. त्यामुळेच त्याच्या वापराबाबत गंभीरता कमी दिसते. म्हणून घरी येणारे प्रत्येक सिलिंडर ‘सील’ काढून तपासूनच घेतले पाहिजे. तसेच, रात्री रेग्युलेटर बंद ठेवले तरी बहुतांश अपघात टाळता येतील." - प्रशांत सूर्यवंशी, वरिष्ठ व्यवस्थापक, भारत पेट्रोलियम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT