Voting esakal
नाशिक

Nashik News: विद्यापीठ अधिकार मंडळाच्‍या निवडणुकीत 84 टक्‍के मतदान; नाशिक जिल्‍ह्‍यातील स्‍थिती

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिकार मंडळांच्‍या निवडणुकीसाठी रविवारी (ता.८) जिल्ह्यात ८४ टक्के मतदान झाले. महाविद्यालयीन परिसंस्‍थांतील अध्यापक, विद्यापीठ अध्यापक आणि विभाग प्रमुख यांनी मतदान झाले.

दरम्‍यान मंगळवारी (ता.१०) विद्यापीठ प्रांगणात मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. (84 percent turnout in University Authority Board elections Situation in Nashik District Nashik News)

निवडणुका परदर्शीपणे पार पडण्यासाठी पुणे विद्यापीठाकडून विविध उपाययोजना केलेल्‍या होत्‍या. नाशिक जिल्‍ह्‍यासह पुणे व नगर जिल्‍ह्‍यातील ४५ मतदान केंद्रांवरील ५२ बुथवर मतदान झाले. जिल्‍ह्‍यात शहरी भागासोबत ग्रामीण क्षेत्रातही मतदान केंद्र उभारण्यात आलेले होते. त्‍यानुसार पात्र मतदारांनी आपआपल्‍या मतदारसंघासाठी हक्‍क बजावला.

बिनविरोध निवड होणाऱ्या गटांतील उमेदवारांची नावे मंगळवारी (ता.१०) विद्यापीठाच्‍या पै. खाशाबा जाधव क्रीडा संकुल येथे घोषित केले जातील. अधिकार मंडळांच्‍या निवडणुकीची मतमोजणी याच दिवशी सकाळी आठपासून पार पडणार आहे.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

या जागांसाठी होती निवडणूक

महाविद्यालयीन, परिसंस्‍थांतील दहा अध्यापक आणि तीन विद्यापीठ अध्यापक अधिसभेसाठी निवडण्यात येत आहेत. प्रत्‍येक विद्याशाखेचे दोन अध्यापक विद्यापरिषदेवर, ३ विभागप्रमुख प्रत्‍येक अभ्यासमंडळावर निवडून देण्यासाठी निवडणूक प्रक्रिया राबविली आहे.

मतदानाची स्‍थिती अशी-

मतदान केंद्रांची संख्या---१२

एकूण मतदारांची संख्या--१ हजार ८०१

झालेले मतदान---------१ हजार ५०१

मतदानाची टक्‍केवारी----८३.८४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युनायटेड किंगडममध्ये फूट पडणार? स्कॉटलंड, वेल्स अन् नॉर्दर्न आयर्लंडचे नेते करणार मोठी घोषणा?

Asia Cup Final, Playing XI: भारताने श्रीलंकेविरुद्ध जिंकला टॉस! ट्रॉफी वादाच्या पार्श्वभूमीवर मोहसिन नक्वींच्या उपस्थितीबाबत सस्पेन्स

Arni Crime: आर्णीत पूजा करण्याच्या बहाण्याने महिलेला गुंगीचे औषध; अश्लील व्हिडिओ काढून पैशांची मागणी

विदर्भात पुन्हा वाघाची दहशत! गडचिरोलीत शेतकऱ्यावर हल्ला, वनविभागाकडून सतर्कतेचा इशारा....

Marathi News Live Updates : नेपाळ महापुरातील मृतांची संख्या १,३८८ वर पोहोचली

SCROLL FOR NEXT