Action taken by traffic police on triple seat riders without helmets nashik news esakal
नाशिक

Nashik News : विनाहेल्मेट, ट्रिपल सीट चालकांना ‘दणका’; स्मार्ट रोडवर वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा बडगा

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहरात सर्रास वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असताना, पोलिसांकडूनही कारवाई होत नव्हती. त्यामुळे मुजोर दुचाकीस्वारांना गुरुवारी (ता.५) वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कारवाईचा दणका दिला.

शहरभर झालेल्या कारवाईत तरुण मुले-मुली विनाहेल्मेट व ट्रिपल सीट आढळले. पोलिसांनी वाहनचालकांविरुद्ध थेट ई- चलनाद्वारे दंड आकाराला असून, यामुळे पालकांचेही धाबे दणाणले आहे.

काही दिवसांपासून शहर वाहतूक पोलिस शाखेकडून होणारी धडक कारवाई मोहीम थंडावलेली होती. (Action taken by traffic police on triple seat riders without helmets nashik news)

केवळ काही मोजक्या सिग्नलवर कारवाई होत होती. परंतु, अशावेळी बेशिस्त वाहनचालक पर्यायी मार्गांचा अवलंब करत होते. तर काही बेशिस्त वाहनचालक वाहतूक पोलिसांसमोरून मुजोरी करीत पलायन करीत होते.

गुरुवारी वाहतूक पोलिस शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्या आदेशान्वये आणि सहायक आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी विनाहेल्मेट, ट्रिपल सीट दुचाकीचालकांना टार्गेट करीत कारवाईचा बडगा उगारला. त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ या दरम्यान सकाळी नऊपासून दुपारी साडेबारापर्यंत व दुपारी पाचपासून सायंकाळी सातपर्यंत कारवाई करण्यात आली.

सकाळी गंगापूर रोडवरील महाविद्यालय व खासगी क्लासेसला जाणारे मुले-मुली हे बहुतांशी विनाहेल्मेट होते. एवढेच नव्हे ट्रिपल सीटही सापडले. महाविद्यालयाच्या गणवेशामध्ये ट्रिपल सीट वाहन चालविताना विद्यार्थ्यांना पोलिसांनी रोखत ई-चलनाद्वारे ऑनलाइन दंड आकारला. काही मुलांनी पोलिसांकडे गयावया करण्याचा प्रयत्न केला परंतु ऑनलाइन दंड आकारल्याने पालकांना आर्थिक फटका बसणार आहे.

हुलकावणी देताना पडले

एका मोपेडवरून विनाहेल्मेट व ट्रिपल सीट येणाऱ्यास वाहतूक पोलिसाने थांबण्याच्या इशारा केला. परंतु त्याने हुलकावणी देत थेट अशोकस्तंभाकडून रविवार कारंजाकडे पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्याने रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या दुचाकीला धडक देत तेही पडले. तशाही स्थितीमध्ये चालकाने मोपेडसह पळण्याचा प्रयत्न केला तर दुसरा त्याच्यामागे पळत गेला. तिसऱ्याला नागरिकांनी पकडून वाहतूक पोलिसांच्या हवाली केले.

अशोकस्तंभावर कारवाई

अशोकस्तंभ चौकात स्मार्ट रोडकडून येणाऱ्या बेशिस्तांवर पोलिसांनी कारवाई केली. ट्रिपलसीट आठ, विनाहेल्मेट सोळा आणि नो-पार्किंगमधील दहा वाहने असे ३४ बेशिस्तांवर ई- चलनाद्वारे ऑनलाइन दंडात्मक कारवाई सकाळच्या सत्रात करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोहन मचारे यांनी दिली.

"बेशिस्त वाहनचालकांविरोधात कारवाई नियमित राबविली जाईल. टप्प्याटप्प्याने ही कारवाई आणखी तीव्र करण्यात येईल. वाहनचालकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचे पालन करावे. तसे केले तर पोलीसांना कारवाई करण्याची गरज भासणार नाही." - चंद्रकांत खांडवी, पोलिस उपायुक्त, शहर वाहतूक शाखा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT