sadhna.jpg
sadhna.jpg 
नाशिक

संघर्षगाथा येवल्यातल्या 'त्या' वाघीणींची...ज्या लढल्याही अन् जिंकल्यादेखील!

संतोष विंचू

नाशिक : (येवला) निम्मं डिपार्टमेंटच कोरोनाच्या विळख्यात सापडल्या नंतरही सगळ्यांनी कणखर मानसिकतेच्या बळावर आजाराला चितपट केलं. एवढंच नव्हे, तर पुन्हा एकदा हे सगळे वीर कोरोनाबाधित, तसेच रुग्णांच्या सेवेत हजर झाले. "अपने कदमों के काबिलियत पर विश्‍वास करता हूँ। कितनी बार टुटा लेकीन, अपनों के लिये जिता हूँ।', हा शेर अगदी तंतोतंत लागू होतो तो येवल्याच्या कोरोना फायटर्स आरोग्यदुतांना...या सगळ्यांच्या जिद्दीला, लढ्याला अन्‌ विजयालाही सलाम...अशाच काही वाघीणींची संघर्षगाथा वाचा त्यांच्याच शब्दांत...  

आम्ही पुन्हा आनंदाने सेवेत...
 

ग्रामीण रुग्णालयात काम करताना तशी कुठलीच लक्षणं नव्हती. आपण पॉझिटिव्ह येणारच नाही, असं वाटत असतानाच सहकाऱ्यांशी तसा रिपोर्ट आला. धक्का बसला. रिपोर्ट येईपर्यंत क्वारंटाइन होतेच. नंतर, इतरांना त्रास होऊ नये म्हणून एका रूममध्ये स्वतःला बंदिस्त करून घेतलं. घरच्यांची खूप काळजी वाटायची. मात्र त्या सगळ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला. पाच दिवस गोळ्या-औषधे आणि दहा दिवस "क' जीवनसत्त्व घेतानाच मन खंबीर केलं. त्यासाठी योगाचा खूप उपयोग झाला. शासनाने सुचविलेल्या सर्व नियमांचे पालन केल्यानंतर बरे होऊन घरी आल्यावर झालेले स्वागत आनंद देणारे होते. आपण आजारी पडलोच नव्हतो, असा विचार करून पुन्हा रुग्णांची सेवा करतोय. - रामेश्‍वरी कडतन, फार्मसिस्ट, ग्रामीण रुग्णालय, येवला 

सकारात्मक विचारानेच आईसह बरी...
 
कुठलीही लक्षणं अन्‌ शक्‍यताही नसताना अहवाल पॉझिटिव्ह आला. आरोग्य सेवेतच असल्यानं फारसा धक्‍का बसला नाही. पण माझ्यामुळे आईही पॉझिटिव्ह झाल्याने टेंशन वाढलं. तेव्हा, कुटुंबातल्या इतरांनी, वरिष्ठांनी धीर दिला. लोकांची सेवा करताना आजार झाला. समाजासाठी काम करत असल्यानं नक्कीच आपण यातून बाहेर पडू, असं सगळे सांगायचे. झालंही तसंच. या काळात आमच्या जेवणाची व्यवस्था नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, कैलास चौधरी, कृष्णा क्षीरसागर, सावरकर फाउंडेशनचे आनंद शिंदे यांनी केली. त्या मदतीनं आणखी धीर मिळाला. या काळात रोज योगा, काढा, सुंठ पावडर, गरम पाणी, दूध-हळद असे सर्व पर्याय अवलंबले आणि सुखरूप बाहेर पडले. काळजी घेतली अन्‌ अनावश्‍यक भीती बाळगली नाही तर कोरोनावर सहज मात करता येऊ शकते, हे नक्की. - गौरी क्षीरसागर, प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रामीण रुग्णालय, येवला 

स्वतःला समजावल्याने मुलगाही सुखरूप... 

प्रसंगी घरादाराची चिंता न करता आपण रुग्णसेवा करतो. कामापासून पळ काढत नाही. पण, जेव्हा आम्हाला कोरोना झाला तेव्हा अनेक जण दूर गेले. त्यामुळं खंत वाटली. मानसिक खच्चीकरण झालं. तेव्हा, मोबाईलवरच्या रिंगटोनप्रमाणे वागायला हवं, असा विचार करून मी माझ्यातच सकारात्मक ऊर्जा निर्माण केली. आनंदी राहण्यासाठी स्वतःला समजावलं. मुलगाही बाधित झाल्यानं आता तर आपल्याला खंबीर व्हावंच लागेल, हा विचार मनाशी घट्ट केला अन्‌ जिंकायचंच या निर्धाराने काळजी घेतली. माझ्यात ती जी चित्रकलेची आवड होती तिच्यासाठी वेळ दिला. योगा, औषधोपचार, गरम पाणी व हळदीचा काढा, सोबत मनाचा निर्धार, सकारात्मक विचार या बळावर अवघ्या आठवडाभरात बरी झाले. मुलाचीही काळजी घेतली. दोघेही सुखरुप आहोत. मी पुन्हा एकदा रुग्णांच्या सेवेत रुजू झाले आहे. - कल्पना धाकराव, अधिपरिचारिका, ग्रामीण रुग्णालय, येवला 

आहार जपला अन्‌ कोरोना विसरले..
 
कोरोना हा आजार प्रत्यक्षात त्रास देत नाही, तर मानसिकताच अधिक छळ करते, हा माझा रुग्णांची सेवा करतानाचा व स्वतः बाधित झाल्यानंतरचा अनुभव आहे. म्हणूनच पहिल्यांदा मी माझं मन खंबीर केलं. भावनिकदृष्ट्या भक्कम बनले. छोट्या मुलीला तसंही दोन महिन्यांपासून आजीकडे सोडून आले होते. त्यामुळं चिंता कमी झाली होती. कोरोना होण्यापूर्वी व झाल्यावरही रोज संगीतमय योगा व पौष्टिक आहाराला प्राधान्य देते. जंकफूडपासून लांब राहते. आधी व आजारातही त्यामुळं माझी ऊर्जा "जैसे थे' होती. शिवाय मी संगीतमय योगाच्या माध्यमातून अन्य सहकाऱ्यांनाही या काळात प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला. त्यातूनही आनंद मिळाला. आम्ही जशी स्वतःचा आजार विसरून लोकांची काळजी घेतो तशीच काळजी आमच्या कॉलनीने घेतल्यानं मिळालेला मानसिक आधार मोठा होता. - साधना पाटील, कक्षसेविका, ग्रामीण रुग्णालय, येवला 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT