Air quality in North Maharashtra will be monitored on the spot through mobile van esakal
नाशिक

Nashik News : उत्तर महाराष्ट्रात हवेच्या गुणवत्तेची आता मोबाईल व्हॅनद्वारे तपासणी

‘एमपीसीबी’चे प्रादेशिक आधिकारी राजपूत यांच्या हास्ते आधुनिक व्हॅनचे उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा

सातपूर (जि. नाशिक) : विविध आस्थापनांतील दुर्घटना, उत्पादन प्रक्रियेमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते व पर्यावरणाचीही मोठी हानी होते.

अशा परिस्थितीत प्रदूषणाची नेमकी किती हानी झाली, याबाबत फिरती व्हॅन नसल्याने मोजमाप करता येत नव्हते. आता स्पॉटवर जाऊन मोबाईल व्हॅनद्वारे अचूक माहिती घेता येणार आहे. पर्यावरण रक्षणासाठी हे सकारात्मक पाऊल असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राजेंद्र राजपूत यांनी सांगितले. (Air quality monitoring in North Maharashtra now through mobile vans Nashik News)

हवा गुणवत्ता तपासणीसाठीच्या आधुनिक मोबाईल व्हॅनच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान, सर्वांत वेगाने विकसित होत असलेल्या नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव व अहमदनगर या उत्तर महाराष्ट्रातील विविध अस्थापनांत निर्माण होत असलेले घातक घटक, रसायन व अन्य साहित्य जाळल्यामुळे तसेच हे घटक प्रक्रिया न करताच नदीपात्रात सोडून दिले जात असल्याने नदी प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे.

हवेचेही प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियत्रंण मंडळातर्फे वेळोवेळी जनजागृती केली जात असली, तरी तपासणीसाठी यंत्रणाच नसल्याने नमुने घेऊन खासगी लॅबमध्ये टेस्टिंगसाठी पाठवावे लागत होते.

तेथून अहवाल येईपर्यंत वाट पाहावी लागत असे. मात्र आता महाराष्ट्र प्रदूषण नियत्रंण मंडळाने एक पाऊल पुढे टाकत आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशी हवा, पाणी, गॅस व इतर तपासणी यंत्रणा बसवून मोबाईल व्हॅन तयार केली आहे.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

उत्तर महाराष्ट्रासाठी नुकतीच पहिली व्हॅन उपलब्ध झाली आहे. या व्हॅनचे लोकार्पण प्रादेशिक अधिकारी राजपूत यांच्या हस्ते झाले. उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गुळे, विनोद पवळे, हेमंत कुलकर्णी, संतोष मोहरे, किशोर पाटील, नितीन चौधरी, अनिकेत चौधरी, विजय पाटील, व्हॅनवरील अधिकारी विक्रम कदम, मयूर साळवे, अनिल सुर्यवंशी, नीलेश चौधरी आदी उपस्थित होते.

व्हॅनद्वारे होणाऱ्या चाचण्या

* वातावरण गुणवत्ता, हवा तपासणी
* प्रदूषण प्रभावित हवेतील घटक
* उद्योग, कारखाने, औष्णिक विद्युत प्रकल्पातून होणारे घातक प्रदूषण
* जंगलतोड आणि वनवा पेटण्यातून होणारे प्रदूषण
* वैयक्तिकसह दळणवळण वाहनांच्या अतिवापरातून होणारे, घातक घटकांमुळे होणारे प्रदूषण
* जीवाश्म इंधनाच्या अतिवापरातून होणारे हवा प्रदूषण
* बांधकाम व पा कामातून धूलिकणाद्वारे होणारे प्रदूषण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: मित्रासाठी सापळा रचला, पण स्वत:च अडकला; आरडीएक्ससह दहशतवादी हल्ला करणार असल्याचा कॉल तरुणाने का केला? सत्य समोर

Ganpati Visarjan 2025 Live Updates : तळेगाव ढमढेरे शिरूरमध्ये विसर्जनावेळी युवक पाण्यात बेपत्ता; शोध सुरूच..!

Ohh Shit... टीम इंडियाचा फॉर्मात असलेला फलंदाज लंगडताना दिसला, तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह! Asia Cup पूर्वी वाढली डोकेदुखी

IndiGo flight technical glitch: कोचीहून अबुधाबीला १८० प्रवाशांसह निघालेल्या इंडिगो विमानात उद्भवला तांत्रिक बिघाड अन् मग...

"नागरिकांच्या जीवाची किंमत आहे का ?" टेस्ला कार घेतल्यानंतर मंत्री प्रताप सरनाईकांना अभिनेत्याचा सवाल, "एवढा पैसा कुठून आला ?"

SCROLL FOR NEXT