maharashtra politics ajit pawar bjp mla ganpat gaikwad eknath shinde dombivali sakal
नाशिक

Ajit Pawar News : पुणे-नाशिक रेल्वेमार्गाची अलाइनमेंट बदलण्याची शक्यता : अजित पवार

सकाळ वृत्तसेवा

Ajit Pawar News : पुणे-नाशिक द्रुतगती रेल्वेमार्गासाठी जिल्ह्यात आतापर्यंत १८ टक्के जमीन संपादित झाली आहे. उर्वरित जमिनी संपादित करण्याची जिल्हा प्रशासनाची तयारी असून, संबंधित शेतकरी देखील जमिनी देण्यास तयार आहेत.

परंतु रेल्वेमार्गाची अलाइनमेंट बदलण्याची शक्यता असून, सरकारच्या निर्देशानुसार कार्यवाही करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली. (Ajit Pawar statement Possibility of changing alignment of Pune Nashik railway line nashik news)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर नाशिक-पुणे रेल्वेमार्गाल गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. उपमुख्यमंत्री पवार यांनी मंगळवारी (ता. ८) याबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला.

जिल्हाधिकारी जलज शर्मा, महारेल, तसेच रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. नाशिक तालुक्यातील जमिनींच्या संपादनासाठी दर निश्चित झाले असले तरी ते जाहीर केलेले नाहीत. परंतु सिन्नर तालुक्यातील काही गावांमधील जमिनीचे दर जाहीर करून तेथे प्रत्यक्ष संपादनही सुरू झाले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

प्रकल्पासाठी आतापर्यंत १८ टक्के जमिनींचे संपादन झाल्याची माहिती जिल्हाधिकारी शर्मा यांनी दिली. उर्वरित जमिनी संपादित करण्याची जिल्हा प्रशासनाची तयारी असून, संबंधित शेतकरी देखील जमिनी देण्यास तयार असल्याची माहिती शर्मा यांनी दिली.

या प्रकल्पाबाबत केंद्रीय मंत्रालयाच्या स्तरावर समिती गठित होणार आहे. त्यामध्ये उपमुख्यमंत्री पवार यांचाही समावेश असणार आहे. पुणे-नाशिक लोहमार्गाची अलाइनमेंट बदलण्याची शक्यता असून, निधीचा विषयदेखील रेल्वे मंत्रालयाकडून लवकरच मार्गी लागण्याची शक्यता शर्मा यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT