Thangaon: The poor condition of the road in Kodipada Ghat. esakal
नाशिक

Nashik News : गुजरात सीमेवरील घाट रस्त्यांना अवकळा; बांधकाम विभागाचे साफ दुर्लक्ष

हंसराज भोये

Nashik News : सुरगाणा तालुक्यातील गुजरात सीमेलगत असलेला घाट रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे.

ठाणगाव- कोडीपाडा घाटाची पावसाळ्यापूर्वीच दयनीय अवस्था झाल्यामुळे येणाऱ्या तसेज गुजरात धरमपूर साईड जायला एकमेव रस्ता असल्याने नागरिकांना प्रचंड समस्यांना सामोरे जावे लागत आहे. (Bad Condition ghat roads on Gujarat border Thangaon Kodipada ghat difficult to pass by vehicle clear neglect of construction department Nashik News)

लोकप्रतिनिधी तसेच प्रशासन फक्त बाऱ्हेपर्यन्त येऊन तेवढ्याच भागातील समस्या सोडवतात, मात्र तेथून खाली कोणताच आमदार या खासदाराने लक्ष दिलेले नाही.

लवकरात लवकर लोकप्रतिनिधी वा प्रशासनाने या रस्त्यांची दुरूस्ती न केल्यास नागरिक गुजरात प्रशासनाकडे हा भाग समाविष्ठ करून घेण्यासाठी निवेदन देतील असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

या घाटामधील रस्त्याची वाटही खूपच धोकादायक बनली आहे. या घाटात नागमोडी वळणे व तीव्र उतार असल्याने बरेच अपघात गेल्या काही दिवसात झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधी मात्र याकडे डोळेझाक करत असल्याने ठाणगाव- कोडीपाडा घाटाची अवस्था धोकादायक झाली आहे.

याच ठाणगाव - कोडीपाडा घाटातून परिवहन महामंडळाच्या राक्षसभुवन ते नाशिक दररोजची बस आहे, परंतु घाटाची अवस्था बघून बसही अर्ध्या रस्त्यातूनच माघारी फिरतात.

एखाद्या दिवशी बस गेलीच तर ती घाटाच्या खालीच बंद अवस्थेत राहते, परिवहन महामंडळ सुद्धा त्या रस्त्याची अवस्था बघून खूप जुनाट आणि खराब बस त्या भागात पाठवतात. घाटात बऱ्याच ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.

रस्त्यालगतच्या साईडपट्टया धोकादायक बनल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अपघात झाल्यावरच अधिकाऱ्यांना जाग येणार का, असा प्रश्न आहे. साईडपट्टीतील भराव काही ठिकाणी वाहून गेल्याने मोठे भगदाड पडली आहेत.

बऱ्याच ठिकाणी घाटात रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनधारकांना मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

"महाराष्ट्र व गुजरात या दोन्ही राज्याला जोडणारा हा मुख्य रस्ता असून या घाटात रस्त्यावर अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या आणि खचण्याच्या अवस्थेत आहे. ठाणगाव - कोडीपाडा घाट सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या व लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षपणामुळे पावसाळ्यात अनेकदा हा घाट बंद असतो.

यामुळे वाहतूक पुर्णतः ठप्प असते. यंदा पावसाळ्यापूर्वी घाटरस्ता दुरुस्त करावा अन्यथा येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकून आमचा संपूर्ण भाग गुजरात राज्याला जोडण्यासाठी गुजरात सरकारला निवेदन देऊ."

- मोहन गावित, सामाजिक कार्यकर्ता, कहांडोळचोंड.

"अनेक वर्षापासून पाठपुरावा करूनही गुजरात राज्याला जोडला जाणारा ठाणगाव -कोडीपाडा घाटाचा रस्ता दुरुस्त होत नाही, तो तत्काळ दुरूस्त करा अन्यथा लोकप्रतिनिधी, आमदार, खासदारांना तालुक्यात फिरू देणार नाही. येणाऱ्या निवडणुकीत प्रचार करू देणार नाही."

- नितीन वाघमारे, महाविद्यालयीन विद्यार्थी, करंजुल सु.

"गेली चार ते पाच वर्षांपासून पंचायत समिती, जिल्हा परिषद, बांधकाम विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही गांभीर्याने कोणीच लक्ष दिले नाही. मागील पंचवार्षिकमध्ये जिल्हा परिषद सदस्यांनीही ढुंकून पाहिले नाही. आलेला निधी कुठे वापरला तोच समाजाला नाही. त्यांचा हिशोब त्यांना द्यावा लागेल."

- गोपाळराव धूम, माजी जिल्हा परिषद सदस्य.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT