Child Trafficking
Child Trafficking esakal
नाशिक

Nashik Child Trafficking : बालकांच्या तस्करीचं मोठं प्रकरण उघडकीस; रेल्वे पोलिसांनी केली तब्बल 59 मुलांची सुटका

अमोल खरे : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : रेल्वे प्रशासनाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलीस यांच्या ऑपरेशन आहट अंतर्गत केलेल्या संयुक्त कारवाईत धावत्या प्रवासी गाडीतून ८ ते १५ वयोगटातील मुलांची तस्करी करणाऱ्या ५ इसमासह ५९ बालकांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाचे जनसंपर्कप्रमुख डॉ. शिवराज मानसपुरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

याप्रकरणी मानवी तस्करी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Big case of child trafficking exposed As many as 59 children were rescued by railway police Nashik News)

रेल्वे प्रशासनाच्या रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे गाडी क्रमांक ०१०४० दानापूर - पुणे एक्सप्रेस मध्ये मदरशाच्या नावाखाली पूर्णिया जिल्ह्य़ातून सांगलीत त्यांची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे भुसावळ रेल्वे स्थानकातुन गाडी सूटल्यानंतर मनमाड स्थानका पर्यंत कसून तपासणी केली असता गाडीतील वेगवेगळ्या बोगीतून एका तस्करासह ८ ते १५ वयोगटातील २९ मुलांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर धावत्या रेल्वे गाडीत मनमाडपर्यंत केलेल्या तपासादरम्यान आणखी ३० मुले आणि ४ तस्करांची ओळख पटली आणि त्यांना मनमाड स्थानकात ताब्यात घेण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

चौकशीत मदरशाच्या नावाखाली पूर्णिया जिल्ह्य़ातून सांगलीत त्यांची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. वैद्यकीय तपासणीनंतर बीएसएलमधून सुटका करण्यात आलेल्या २९ मुलांना चाइल्ड हेल्प डेस्कच्या एनजीओमार्फत जळगावला पाठवण्यात आले.

चाइल्ड वेल्थ सेंटरच्या निर्देशानुसार बालगृह/जळगाव येथे सुटका करण्यात आलेली मुले सुपूर्द करण्यात आली.

मनमाड येथे सुटका करण्यात आलेली मुले चाइल्ड हेल्प डेस्क एनजीओ/नासिक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली असून त्यांना ३१ मे रोजी हजर केले जाईल.याप्रकरणी मनमाड आणि भुसावळ येथे भादंवी ५७७ / २३ अन्वये ३७० तस्कराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूला दुसरा धक्का! अर्धशतकानंतर डू प्लेसिस आऊट, पण विकेटमुळे झाला ड्रामा

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT