Suspected fugitive accused Ramesh Parasharam Gawande.  esakal
नाशिक

Nashik Crime News : कुऱ्हाडीचे घाव घालत दीराने केली भावजयीची निघृण हत्या

सकाळ वृत्तसेवा

सुरगाणा (जि. नाशिक) : तालुक्यातील बिवळ येथे सख्या चुलत दीराने कुऱ्हाडीचे घाव घालून भावजयीची निघृण हत्या (Crime) केली. संशयित आरोपी फरार झाला आहे. (brother wife brutally murdered by close cousin with knife wound nashik crime news)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी चंदर गावंडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, दुपारी अकरा वाजेच्या दरम्यान मयत यशोदा लक्ष्मण गावंडे (वय २६) ही विवाहिता राहत्या घरी स्वयंपाक करत असतांना तेथे संशयित आरोपी सख्खा चुलत दीर रमेश परशराम गावंडे हा हातात कुऱ्हाड घेऊन आला. त्याने यशोदा यांच्या डोक्यावर, मानेवर, मागील बाजूस कुऱ्हाडीचे सपासप चार वार केले.

कुऱ्हाडीचे घाव इतके खोलवर होते की, मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या पुर्णपणे तुटल्याने मोठ्याप्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता आरोपीच्या चपला, गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड ताब्यात घेत पंचनामा केला आहे. विवाहितेस एक दोन महिन्याचे अपत्य आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. संशयित आरोपी फरार झाला असून पोलिस निरीक्षक संदीप कोळी कसून तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Assembly Election 2025: बिहार निवडणुकीच्या तारखांची घोषणा करत, ‘ECI’ने मतदारांनाही केल्या १० महत्त्वाच्या सूचना!

India Cricket Team: अजित आगरकर, गौतम गंभीरचा 'सिक्रेट प्लान'! रोहित शर्मा, विराट कोहली लवकरच होणार माजी खेळाडू

Crime: पैसे परत कर नाहीतर...; प्रेयसीची धमकी, ५० वर्षीय प्रियकर संतापला, रागाच्या भरात २ मुलांसह महिलेसोबत धक्कादायक कृत्य

सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्म महत्त्वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

IND vs PAK : भारताच्या 'पोरींना' दिला त्रास, ICC ने उतरवला माज! पाकिस्तानच्या खेळाडूवर कारवाई

SCROLL FOR NEXT