dams in district have only 34 percent water storage nashik news esakal
नाशिक

Nashik Water Shortage : धरणांमध्ये यंदा अवघे 34 टक्केच पाणी; रिमझिम पावसामुळे धरणसाठ्यात अत्यल्प वाढ

सकाळ वृत्तसेवा

Nashik Water Scarcity : जुलै महिन्यातील २० दिवस संपत आलेले असताना जिल्ह्यातील धरणांमध्ये अवघे ३४ टक्के जलसाठा आहे.

गेल्यावर्षी जुलैमध्ये धरणांमध्ये ८० टक्के साठा होता. रिमझिम पावसाने धरणसाठ्यात पाहिजे त्या प्रमाणात वाढ न झाल्याने नाशिककरांवर पाणी कपातीचे संकट ओढवले आहे. ( dams in district have only 34 percent water storage nashik news)

नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये सरासरी ३४ टक्के साठा असला तरी आळंदी, तिसगाव, नागासाक्या, माणिकपूंज ही धरणे कोरडीठाक पडली आहेत. भोजापूर, वाघाड सारखी धरणेही तळाला गेल्यामुळे दुष्काळाचे सावट अजूनही दूर झालेले नाही.

रिमझिम पाऊस सातत्याने पडत असल्याने भाताच्या आवणीला सुरवात झालेली दिसते. पेरण्याही ४० टक्क्यांवर पोहोचल्या आहेत. पण मका, बाजरी, कापसाच्या पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे.

जिल्ह्यात सरासरी १२७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून जुलै महिन्यात सरासरी ३०८ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित आहे. राज्यात सर्वत्र पडत असलेल्या पावसाने नाशिक जिल्ह्यावर कृपादृष्टी दाखविल्यास नाशिककरांवरील दुष्काळाचे मळभ दूर होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कुठल्या धरणात किती टक्के साठा

धरण......२०२२....२०२३

गंगापूर.....६२.......४१

काश्यपी...७९.....२३

पालखेड....५१...३५

करंजवण...८१....२४

ओझरखेड....१००...२५

दारणा......६६.....६४

भावली.....१००.....६९

चणकापूर.....४७....४५

नागासाक्या...४......०

एकूण........८०...३४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक! प्रवाशांचे होणार हाल; वेळापत्रक पाहूनच बाहेर पडण्याचे आवाहन

New Kabaddi Rules Changes 2026 : कबड्डीचे नियम बदलले! आता बदली खेळाडू आणि लॉबीच्या नियमात मोठा बदल; जाणून घ्या कबड्डीचे नवीन 6 नियम

IND vs WI: वेस्ट इंडिजच्या ऐतिहासिक विजयामागे धोनीचा हात? शाय होपने उघडलं राज; म्हणाला, ‘माहीने मला हेच सांगितलं होतं...’

Latest Marathi News Live Update : निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा’; पालघरमधून मनसैनिक-शिवसैनिक मुंबईत दाखल

BSF Jawan: देशसेवेचे स्वप्न साकारले, २२ वर्षे सीमांवर कर्तव्य बजावले; BSF जवानाचा अचानक मृत्यू, कर्तव्यावर अन् काय घडलं!

SCROLL FOR NEXT