Corona updates
Corona updates esakal
नाशिक

नाशिक जिल्‍ह्‍यातील ॲक्‍टिव्‍ह कोरोना रुग्‍ण संख्येत घट

अरुण मलाणी

नाशिक : कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव ओसरत असतांना उपचार घेणाऱ्या बाधितांच्‍या संख्येतही घसरण सुरु आहे. तिसरी लाट आल्‍यापासून प्रथमच जिल्‍ह्‍यातील ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्या एक हजारांच्‍या आत आली आहे. शुक्रवारी (ता.१८) जिल्‍ह्‍यात १२४ रुग्‍णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. तर २५५ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. एका बाधिताच्‍या मृत्‍यूची नोंद आहे. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत घट झाली असून, सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्‍यातील ९८८ बाधितांवर उपचार सुरु आहेत.

जिल्‍ह्‍याचा पॉझिटिव्‍हीटी दर २.७० टक्‍के

नाशिक शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरला असला तरी ग्रामीण भागात रुग्‍ण संख्येत किरकोळ वाढ झालेली आहे. नाशिक शहरातील २७ तर नाशिक ग्रामीणमधील नव्वद रुग्‍णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. मालेगाव महापालिका क्षेत्रातील एक तर जिल्‍ह्या बाहेरील सहा रुग्‍णांना कोरोनाची लागण झाल्‍याचे निदान झाले. एका बाधिताच्‍या मृत्‍यूची नोंद असून, मृत हा नाशिक ग्रामीण भागातील आहे. सलग दुसऱ्या दिवशी नाशिक शहरातील मृतांचा आकडा निरंक राहिला.

सायंकाळी उशीरापर्यंत ९६७ अहवाल प्रलंबित होते. यापैकी सर्वाधिक ८१२ प्रलंबित अहवाल नाशिक ग्रामीणमधील आहेत. नाशिक शहरातील ८८, तर मालेगावच्‍या ६७ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती.

शुक्रवारी जिल्‍ह्‍याचा पॉझिटिव्‍हीटी दर २.७० टक्‍के राहिला. यात नाशिक ग्रामीण भागाचा दर ३.४४ टक्‍के तर नाशिक महापालिका क्षेत्राचा दर १.४९ टक्‍के राहिला. सध्या अकरा बाधितांवर व्‍हेंटीलेटरद्वारे उपचार सुरु आहे. तर ४९ बाधितांना उपचारादरम्‍यान ऑक्‍सिजनची आवश्‍यकता आहे. उपचार घेणाऱ्यांपैकी ९६ बाधितांमध्येच लक्षणे आढळून आले आहेत. ८९२ रुग्‍णांमध्ये कुठल्‍याही स्‍वरुपाचे लक्षणे नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT