Disale Guruji Pattern will be implemented for municipal school students nashik news esakal
नाशिक

NMC Shool News : महापालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी ‘डिसले गुरुजी पॅटर्न’ राबविला जाणार...

सकाळ वृत्तसेवा

NMC Shool News : महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या घरी डिसले सरांचा पॅटर्न राबविला जाणार आहे याअंतर्गत सायंकाळी सात ते नऊच्या दरम्यान टीव्ही व मोबाईल बंद ठेवण्याच्या सक्तीचा पायलट प्रोजेक्ट पालक व शिक्षकांसाठी राबविला जाणार आहे.

प्रोजेक्टच्या यशस्वीतेनंतर खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी अंमलबजावणी केली जाणार आहे. (Disale Guruji Pattern will be implemented for municipal school students nashik news)

महापालिकेच्या विद्यार्थ्यांना स्मार्ट करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रशासनाधिकारी बी. टी. पाटील यांनी नवीन संकल्पना आणली आहे. यात सोलापुर जिल्ह्यातील शिक्षक डिसले यांचा पॅटर्न अमलात आणला जाणार आहे.

आधुनिक युगाशी मोबाईल व टीव्हीच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक जोडले गेले असले तरी त्याचे दुष्परिणामदेखील दिसून येत आहे. त्यामुळे डिसले पॅटर्न राबविला जाणार आहे. महापालिकेच्या शाळेत जवळपास ३५ हजार विद्यार्थी व ८३५ शिक्षक आहेत. शिक्षक व विद्यार्थ्यांसह पालकांना सांयकाळी सात ते नऊ वेळेत घरी टीव्ही, मोबाईल न वापरणे बंधनकारक राहणार आहे.

या वेळेत पालकांनी टीव्ही, मोबाईल बंद ठेवून विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घ्यायचा आहे. यावर केंद्रप्रमुख, शिक्षकांना लक्ष ठेवावे लागणार आहे. शिक्षकांना विद्यार्थ्याच्या घरी जाऊन उपक्रमाची अंमलबजावणी होते की, नाही यासंदर्भात शहानिशा करावी लागणार आहे. शिक्षकांनी उपक्रमाकडे दुर्लक्ष केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाधिकारी पाटील यांनी दिला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दफ्तरमुक्त शनिवार

वाढते दप्तराचे ओझे लक्षात घेऊन महापालिकांच्या शाळांमध्ये दर शनिवारी ‘दप्तरमुक्त शनिवार’ उपक्रम राबविला जाणार आहे. त्यात शनिवारी शाळेत दप्तर आणण्याची आवश्‍यकता राहणार नाही. त्याऐवजी शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने होतील. निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी केली जाणार आहे.

ताळमेळ कसा बसणार?

प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन मोबाईल, टिव्ही बंद आहे की नाही, याची तपासणी करण्याची सक्ती आहे. विद्यार्थी संख्या ३५ हजार व शिक्षक ८३५ आहेत. त्यामुळे सक्तीची अंमलबजावणी बाबत साशंकता आहे. संकल्पना चांगली असली तरी शिक्षकांचा प्रतिसाद व पुरेसे मनुष्यबळ याचा ताळमेळ कसा बसेल, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT