Water Supply Scheme : गिरणा धरणावरील ५६ खेडी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेवरील नवे पांझण केंद्रावरील उपसा पंप पुन्हा नादुरुस्त झाल्याने योजनेवरील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.
पंप दुरुस्ती साठी दोन दिवसाचा कालावधी लागणार असल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पिण्याची पाण्यासाठी नांदगावकरांना धावाधाव करण्याची वेळ आलेली आहे. (Disrupted water supply of 56 villages scheme Nashik news)
वारंवार उद्भवणाऱ्या गळतीमुळे अगोदरच ५६ खेडी नळयोजना विवादात सापडली आहे. एरवी अधून मधून जलवाहिन्या वारंवार फुटत असताना आता पंप नादुरुस्त झाल्याने पाणीपुरवठा विस्कळित झालेला आहे.
कधी उद्भव विहिरीवरचे व्हीटी पंप तर कधी मुख्य जलवाहिनीच्या व्हॉल्व्ह मधून लाखो लॉटरी पाण्याचा नासाडी, जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचा देखभाल व दुरुस्ती साठी लाखो रुपये खर्ची पडूनही या गळत्या व नादुरुस्ती थांबत नसल्याने नांदगावकरांकडून याविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
५६ खेडी पाणीपुरवठा योजना कालबाह्य आहे. जलवाहिन्या जुन्या झाल्या आहे. अशा साचेबंद सबबी सांगून मोठ्या प्रमाणात वाढलेल्या पाणी गळतीकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. सध्या या योजनेचा उपसा करणाऱ्या तीन व्हीटी पंप पैकी दोन पंप नादुरुस्त होऊ लागले आहे.
त्यातच गिरणा धरण ते नवे पांझण जलशुद्धीकरण पर्यंत वारंवार जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार वाढले आहेत. नजीकच्या काळात आकाराला येणाऱ्या ७८ खेडी या महत्वाकांक्षी नळपाणी पुरवठा योजनेचे असेच होऊ नये अशी अपेक्षा आता नांदगावकर व्यक्त करत आहे.
दरम्यान दोन दिवसात दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन योजनेचा पाणी पुरवठा पूर्वपदावर येऊन तो सुरळीत राहील अशी माहिती देखभाल पथकाकडून देण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.