death-3.jpg 
नाशिक

थरारक! बायकोच्या चारित्र्यावर होता नवऱ्याला संशय...मध्यरात्रीच केला 'असा' अंगावर काटा आणणारा प्रकार

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (म्हसरूळ) पत्नीच्या चारित्र्यांवर पती संशय घेत असल्याने दोघात वारंवार भांडणे होत असत. शुक्रवारी (दि. १७) रात्री जेवणं आटोपल्यानंतर दोघे वरच्या त्यांच्या खोलीत झोपायला गेले. तेथे त्यांचे वाद झाले. आरतीचा जोरात ओरडण्याचा आवाज ऐकू आल्याने सगळे खोलीत पळत आले अन् समोर बघता तर धक्काच....

नेहमीच व्हायचे कौटुंबिक वाद...

फुलेनगर परिसरातील तीन पुतळे भागात राहणाऱ्या एका पतीने त्याच्या पत्नीच्या डोक्यात दगडी पाटा घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन तिचा खून केला असल्याचे पोलिसांच्या तपासात समजले आहे. खून करून पती स्वतःहून पंचवटी पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याला अटक करण्यात आली आहे. या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फुलेनगरमधील तीन पुतळे परिसरातील मुंजोबा गल्लीत सागर गणपत पारधी (वय २३) हा राहतो. तो मार्केटयार्डात हमालीचे काम करतो. त्याचा विवाह १ जुलै २०२० रोजी त्र्यंबक रस्त्यावरील पिंपळगाव येथील आरती (वय १९) या मुलीशी झाला. लग्न झाल्या दिवसापासून त्यांच्या वारंवार वाद होत असल्याचे, त्याच्या कुटुंबातील व्यक्तींनी पोलिसांना सांगितले.

अशी घडली घटना

शुक्रवारी (दि. १७) रोजी रात्री अकराच्या सुमारास सचिन व आरती या दोघांनी आई, वडील व भाऊ यांच्यासोबत रात्रीचे जेवण एकत्र केले. ते दोघे घराच्या वरच्या त्यांच्या खोलीत झोपायला गेले. तेथे त्यांचे वाद झाले. त्यांच्या नेहमी बाद होत असल्याने आई, वडील व भाऊ यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. आरतीचा जोरात ओरडण्याचा आवाज ऐकू आल्याने त्यांनी खोलीत जाऊन बघितले असता, ती रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती. तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी ती मृत झाल्याचे सांगितले. या प्रकरणी पती सागर पारधी यांच्याविरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Auction: डोळ्यांत अश्रू, बोलायला शब्द नाहीत… शिक्षकाच्या मुलावर IPL लिलावात कोट्यवधींचा वर्षाव, बापाचं स्वप्न साकार झालं

भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार, मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांकडून हल्ला; घटना CCTVमध्ये कैद

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर: सिव्हिल हॉस्पिटलमधील किमोथेरपी सेंटर अद्याप बंदच

Coinex Pune 2025 : दुर्मीळ नाण्यांचा खजिना बघण्याची पुणेकरांना संधी; ‘कॉइनेक्स पुणे २०२५’ शुक्रवारपासून

बॉबी देओल पुन्हा एकदा दिसणार बाबा निरालाच्या भूमिकेत ? आश्रम सीजन 4 ची चर्चा

SCROLL FOR NEXT