Associate Professor at De Montford University in Britain while showing the poster ticket of Sharafat movie. Monia Achieri and 35 mm projector received from Todkar family for research. esakal
नाशिक

Nashik News : जुन्या चित्रपटांच्या आठवणी जपण्याचा प्रयत्न : डॉ. मोनिया अचिएरी

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : भारतीय चित्रपटांत विविध अंग पाहावयास मिळतात. चित्रपटांमध्ये विविधता असून, जगातील चित्रपटसृष्टीत भारतीय चित्रपटसृष्टीचे खूप मोठे योगदान आहे.

भारतीय चित्रपटांच्या जुन्या आठवणी जतन करणे, त्या संग्रहित करण्यासाठी भारतातील दादासाहेब फाळके यांच्या नाशिकनगरीत आली असल्याची माहिती ब्रिटनमधल्या डी मॉन्टफर्ड विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक डॉ. मोनिया अचिएरी यांनी बुधवारी (ता. २३) पत्रकार परिषदेत दिली. (Dr Monika Achieri statement Trying to preserve memories of old movies nashik news)

या वेळी नितीन परांजपे, ज्येष्ठ पत्रकार अपर्णा वेलणकर उपस्थित होते. डॉ. मोनिया अचिएरी म्हणाल्या, की नाशिकमधील सिंगल स्क्रीन सिनेमा थिएटर्स, त्याचे शहराशी असलेले जुने नाते या विषयावर काम करीत असून, चित्रपटाच्या जुन्या इतिहासाशी संबंधित अनेक वस्तू नाशिकमधल्या चित्रपटवेड्या लोकांकडून जमा करीत आहे.

लोकांनी अजून जपून ठेवलेली जुनी तिकिटे, रेकॉर्ड कव्हर्स, पोस्टर्स, गाणी असा खजिना शहरातून शोधला असून, ओरल हिस्टरीचा भाग म्हणून सर्कल चित्रपटगृहातील डोअर किपर्स राजू गेंड यांच्यापासून चित्रपटगृहाचे संचालक, तिकीट विक्रेते, ब्लॅक तिकीट विक्रेते यांच्याशीही संपर्क करून मुलाखतीही रेकॉर्ड केल्या आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

संशोधनातून भारतीय चित्रपटाविषयीच्या ऐतिहासिक आठवणी संग्रहित करण्याचा प्रयत्न आहे. येत्या ३० नोव्हेंबरला कुसुमाग्रज स्मारक येथे ‘अभिव्यक्ती’तर्फे आयोजित अंकुर महोत्सवात चित्रपट प्रदर्शन होईल.

त्या माध्यमातून फिल्म हेरिटेज ही संकल्पना रुजविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी या वेळी बोलताना नमूद केले. या संशोधनासाठी नाशिककरांच्या संग्रहात काही असल्यास डॉ. मोनिया यांना indianfilmarchives@gmail.com यावर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT