esakal
esakal
नाशिक

Epidemic Precaution : साथरोग उद्‍भवणार नाही याची दक्षता घ्या; जिल्हा परिषद प्रशासनाचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा

Epidemic Precaution : जिल्ह्यात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याबाबत काळजी घेणे व उपाययोजना राबविण्याबाबत जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागातर्फे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना निर्देश दिले आहेत.

पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे एकाही ठिकाणी साथ उद्‍भवणार नाही, यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले आहे. (epidemics precautions Direction of Zilla Parishad Administration nashik news)

ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध व सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे आणि जलजन्य आजारांवर नियंत्रण ठेवणे हा पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश असून, गावाला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे हे ग्रामपंचायतीचे मूलभूत कर्तव्य आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी व स्वच्छता विभागातील पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत सर्व तालुक्यांना याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

यात प्रामुख्याने शास्त्रीय पद्धतीने नियमित शुद्धीकरण प्रक्रिया करून पाणीपुरवठा करणे, जलस्रोताजवळचा व जलवाहिन्यांजवळचा परिसर स्वच्छ ठेवणे, पाणीपुरवठा यंत्रणांची वेळेवर व सुयोग्य देखभाल करणे, गटविकास अधिकाऱ्यांनी दूषित पाणी नमुन्याबाबतचा दरमहा आढावा घेऊन याबाबत आवश्यक ती उपाययोजना करणे या बाबींचा समावेश आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

स्वच्छतेच्या घटकांमध्ये सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होतो किंवा नाही, याची पाहणी करून आवश्यक ती उपाययोजना करणे, डास/माश्यांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून स्वच्छताविषयक उपाययोजना करणे, पाणी शुद्धीकरणासाठी सर्व स्तरांवर योग्य दर्जाच्या ब्लिचिंग पावडरचा, सोडियम हायपोक्लोराईट द्रावण, तुरटी यांचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवणे, सार्वजनिक विभागामार्फत क्लोरिन द्रावणाचा अथवा क्लोरिनच्या गोळ्यांचा साठा प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच उपकेंद्रात उपलब्ध करून देणे,

ज्याठिकाणी साथीच्या रोगांचा उद्रेक झाला असेल किंवा होण्याची शक्यता असेल त्या ठिकाणी घरोघरी या द्रावणाच्या बाटल्यांचा अथवा क्लोरिनच्या गोळ्यांचा उपयोग करून पाणी शुद्धीकरण करणे, नजीकच्या प्रयोगशाळेत आपल्या कार्यक्षेत्रातील स्रोतांच्या पाणी नमुन्यांची तसेच टीसीएल पावडरची तपासणी करणे याबाबत सर्व गटविकास अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray:"मी काही ज्योतिषी आहे का?"; मतदानानंतर राज ठाकरेंचं पत्रकारांना उत्तर

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Gullak 4: प्रतीक्षा संपली! गुल्लक-4 येणार प्रेक्षकांच्या भेटाला, कधी रिलीज होणार वेब सीरिज? जाणून घ्या

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT