Sallher Fort esakal
नाशिक

बागलाण तालुक्यातील ऐतिहासिक वैभव विकासापासून वंचित

सकाळ वृत्तसेवा

साल्हेर (जि. नाशिक) : सटाणा शहरापासून पन्नास किलोमीटर अंतरावर व गुजरात राज्याची सीमा १५ किलोमीटर असलेला साल्हेर किल्ला विकासापासून वंचित आहे. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षांपूर्वी साल्हेर गाव दत्तक घेतलेले असतानाही परिसराचा फारसा विकास झालेला नाही.

लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे विकास खुंटला...

साल्हेर किल्ला पर्यटनस्थळ असल्याने महाराष्ट्रासह गुजरात व इतर राज्यातून पर्यटक मोठ्या संख्येने येतात. किल्ल्याच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य शिवस्मारक उभारण्याची घोषणा आमदार दिलीप बोरसे यांनी मोठा गाजावाजा करत केली होती. त्याच दिवशी लोकसहभागातून चौदा ते पंधरा लाख रुपये जमा झाल्याची माहिती खुद्द आमदार बोरसे यांनीच दिली होती. मात्र, कित्येक दिवसांपासून साल्हेर किल्ला व परिसर विकासासंदर्भात अद्याप कुठलीच पावले उचलण्यात आलेली नाही. आजी- माजी लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे या भागाचा विकास खुंटल्याचा आरोप नागरीक करीत आहेत.

साल्हेर किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) काळातील शिव मंदिर, परशुराम बाबा मंदिर, कालिका देवी मंदिर, पाण्याचे तळे किल्ल्याचे दरवाजे, गुप्त गुहा या शिवकालीन वास्तू पर्यटकांना बघावयास मिळतात. या भागाचा विकास झाल्यास बागलाण तालुक्याचे मोठे पर्यटनस्थळ होऊन वैभवात भर पडेल. स्थानिक आदिवासी तरुणांचा रोजगाराचा प्रश्‍न यानिमित्ताने मार्गी लागू शकतो.

"साल्हेर किल्ला पावसाळ्यात निसर्गाने फुलून गेलेला असतो. अशावेळी परिसरात विकासकामे झाली तर पर्यटकांची मोठी गर्दी होऊ शकते. मात्र, हिवाळ्याचे काही दिवस गेल्यानंतर साल्हेर किल्ला पूर्णपणे उजाड दिसतो. उन्हाळ्यात या भागात पर्यटक येत नाही. विकासकामांना चालना देऊन साल्हेर किल्ला व परिसरात विकासकामांना चालना द्यावी."

- राणी भोये, सरपंच, साल्हेर

"साल्हेर किल्ला व त्या अंतर्गत येणाऱ्या परिसराच्या विकासाला लवकरच चालला मिळेल. या परिसरात गायकवाड राजवटीच्या जुन्या काही इमारती आहेत. त्याही महाराष्ट्र राज्य सरकारकडे वर्ग झाल्या की नाही, याचाही पाठपुरावा सध्या सुरू आहे. साल्हेर किल्ला परिसरात शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक करून विकासासाठी कटिबद्ध आहे."

- दिलीप बोरसे, आमदार, बागलाण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT