sakal
sakal
नाशिक

Insurance Claim : वाहतूक नियमाचे पालन करत नसाल तर सावधान! ‘इन्शुरन्स क्लेम’ नाकारला जाऊ शकतो...

योगेश मोरे : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : एरवी सर्वसामान्य नागरिक वाहतूक नियमांची पायमल्ली करताना दिसतात. मात्र, असे करताना थोडा विचार करणे गरजेचे आहे, कारण जेव्हाही एखादा अपघात होतो, तेव्हा आपण वाहतूक नियमांचे पालन करून वाहन चालवत होता की नाही याची नोंद पोलिस दफ्तरी होते.

परिणामी, आपला अपघात विमा पास होणे अथवा न होणे त्यावर निर्भर असते. यातूनच वाहतूक नियमाचे पालन करण्याचे महत्त्व अधोरेखित होत आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयातून प्रथम शिकाऊ लायसन्स, नंतर पक्के लायसन्स काढले जाते. त्यांनतर वाहन चालविण्यासाठी पात्र ठरतो. (Insurance claim can be rejected if you are not following traffic rules nashik news)

मात्र, किती चालक हे वाहतूक नियमाचे पालन करतात, हा संशोधनाचा भाग आहे. ज्या वेळी अपघातात कर्ता पुरुष दगावतो. त्याच्या पश्चात कुटुंब मात्र उघड्यावर येते.

आजकाल सर्वच अपघात विमा काढतात. जेणेकरून आपल्यानंतर कुटुंबाला मोठी रक्कम मिळेल. मात्र, अपघाती विमा पास होण्यासाठी सदर व्यक्ती वाहतुकीचे नियम पालन करत होता किंवा नव्हता हेदेखील महत्त्वाचे असते. कारण की, याबाबत घटनास्थळ पंचनामा करणारे पोलिस फिर्यादीमध्ये नोंद घेतात.

बऱ्याचदा वाहतुकीचे नियम न पाळता मार्गक्रमण करताना अपघातात मृत्यू होतो. त्यामुळे बऱ्याच कुटुंबांना अपघाती विम्याचा काहीही फायदा होत नाही. ती व्यक्ती जिवानिशी जाते आणि आपल्या पश्चात वारसाला विम्याचा लाभही मिळत नाही. त्याचे कारण केवळ वाहतुकीचे नियम न पाळता वाहन चालविणे होय. त्यासाठी वाहतूक नियम पालन किती महत्त्वाचे आहे, हे अधोरेखित होते.

उड्डाणपुलावरून जाताय का?

उड्डाणपुलावरून दुचाकीस्वारांना बंदी करण्यात आली, वाहतूक नियमदेखील आहे. आपला वेळ वाचविण्यासाठी आपण जर उड्डाणपुलावरून दुचाकी घेऊन जात असताना वाहतूक पोलिस दंडात्मक कारवाई करत आहेत. मात्र, या दरम्यान अपघात झाला तर आपला अपघाती विमा पास होणार नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

‘पायात बूट, तरच क्लेमला बूस्ट’

दुचाकीस्वारांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता ठेवावी. लायसन्स बंधनकारक आहेच, परंतु दुचाकी चालविताना हेल्मेट अवश्य वापरावे. चुकीच्या दिशेने दुचाकी चालवू नये, ट्रिपल सीट चालू नये, वेगमर्यादा ठेवावी, मद्यपान करून वाहन चालवू नये, याबरोबरच दुचाकी चालविताना पायात बूट घालणे अनिवार्य आहे. अपघातसमयी दुचाकीस्वारांच्या पायात बूट नसेल तरीही विम्याचा क्लेम रिजेक्ट होतो, अशी महत्त्वपूर्ण माहिती वाहतूक शाखेने दिली.

"मोटार वाहन विभागाचे नियम आहेत, हे आपल्या सुरक्षेसाठी आहेत. अपघातानंतर जो काही इन्शुरन्स क्लेम मिळतो. तो मिळविताना कुठलाही अडथळा होऊ नये यासाठी नियम आहेत. वाहनाचे कागदपत्र वैध असणे, अनुज्ञप्ती घेणे, सुरक्षित गाडी चालवणे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत."- प्रशांत देशमुख उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक.

"वाहतूक नियमांची पायमल्ली करीत दुचाकी चालविताना दुर्दैवाने अपघात झाल्यास इन्शुरन्स क्लेम पास होण्यास अडचणी येतात. यासाठी वाहतूक नियमांचे पालन करीतच दुचाकी चालवावी. हेल्मेटशिवाय दुचाकी चालवू नये. स्वतःच्या जीवांसाठी नियमांचे पालन अत्यंत गरजेचे आहे." - अंकुश शिंदे, पोलिस आयुक्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT