safety box of the streetlights threw away & reign of garbage in Park esakal
नाशिक

Nashik News : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले उद्यान; टवाळखोरांच्या जाचामुळे असूनही नसल्यासारखे!

सकाळ वृत्तसेवा

सिडको (जि. नाशिक) : जगतापनगर येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले उद्यान दुरवस्थेबाबत येथील स्थानिक रहिवाशांनी प्रशासनास कळवूनही काहीही उपाययोजना झालेली नाही. येथे रात्री टवाळखोरांचा जाच असल्याने उद्यान असूनही त्याचा लाभ घेता येत नसल्याचे स्पष्ट केले आहे. (Krantijyoti Savitribai Phule Udyan ignorance of administration nashik news)

पेव्हर ब्लॉक समस्या

उद्यानातील कौलारू स्टेजची मोडतोड झालेली असून, लहान मुल येथे खेळावयास गेल्यावर अपघाताची शक्यता आहे. काही अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोणास धरावे, असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. खेळणी चांगल्या अवस्थेत असल्या तरी मात्र स्वच्छता वेळोवेळी होत नसून उद्यानात कचऱ्याचे साम्राज्य आहे.

येथील कचरा वेळोवेळी उचलून नेण्याची तसदी मनपा कर्मचारी घेत नाही. उद्यानातील पथदीपांना असणाऱ्या सुरक्षा डीपींनी मान टाकली आहे. फुटपाथवरील पेव्हर ब्लॉक वर खाली झालेल्या अवस्थेत असून नागरिकांना त्याचा वापरही करता येत नाही. उद्यानाच्या शेजारी एका खासगी बांधकाम व्यावसायिकाचे साहित्य उद्यानात पडून आहे.

स्टेजवरील कौलांची दुरवस्था.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले उद्यान, जगतापनगर
* उद्यानात मद्यपींचा व टवाळखोरांचा जाच
* स्टेजवरील कौलांची दुरवस्था.
* उद्यानात कचऱ्याचे साम्राज्य
* पेव्हर ब्लॉक समस्या
* पथदीपांच्या सुरक्षा बॉक्सने टाकली मान
* बांधकाम साहित्य उद्यानातच पडलेले

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

"उद्यानातील खेळणी चांगल्या अवस्थेत असल्या तरी मात्र येथे कचऱ्याचे साम्राज्य आहे. येथे स्वच्छता वेळोवेळी केली जात नाही. यामुळे येथे विविध रोगांना आमंत्रण देण्यासारखे प्रकार घडू शकतात."- संगीता नाफडे, गृहिणी

"उद्यानात बांधलेल्या स्टेजवरील कौले तुटलेल्या अवस्थेत असून, लहान मुले खेळण्यासाठी गेल्यानंतर दुखापत होण्याची दाट शक्यता असूनही येथे दुरुस्ती केली जात नाही."
- दीपाली महाजन, गृहिणी

"उद्यानामध्ये मद्यपी, गावगुंडासह प्रेमीयुगुल अनेकदा ठाण मांडून बसलेले असतात. लहान मुलांना उद्यानात कसे घेऊन जावे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यापेक्षा खासगी उद्यानात घेऊन जाणे योग्य वाटते."- अर्चना नेरकर, गृहिणी

"उद्यानात बसवण्यात आलेल्या पथदीपांच्या सुरक्षा बॉक्सने अक्षरशः मान टाकली असून अनेकदा येथील लाइट बंद स्थितीत असतात. लहान मुलांना सांयकाळी उद्यानात घेऊन जाण्याची भीती वाटत असते."- प्रमिला पाटील, गृहिणी

"उद्यानाच्या बाजूस सुरु असलेल्या बांधकामाची खडी उद्यानात पडलेली असून ही साफसफाई करण्याची साधी तसदीदेखील मनपा प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी घेत नाहीत. येथील पेव्हर ब्लॉकदेखील वर, खाली झालेले आहेत."- विजया पाटील, गृहिणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT