Inspirational News Lalita Mali Deshmukh esakal
नाशिक

Inspirational News : फसवणूक झालेल्या कुटुंबीयांचा आधारवड ‘ललिताताई’

विजयकुमार इंगळे

रोजीरोटीच्या लढाई जिंकत कुटुंबासाठी चांगले दिवस यावेत, म्हणून गाव सुटलं... कुटुंबाला हातभार लावत शिवणकामातून तिचेही प्रयत्न सुरू होते. पतीची होणारी धडपड कमी करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांत नियतीच्या फेऱ्यात जणू दुःखाचं आकाशच तिच्या कुटुंबावर कोसळलं.

भाजीपाला व्यापारी म्हणून कुटुंबासाठी आधार असलेल्या पतीला परप्रांतीय व्यापाऱ्यांनी लाखोंना गंडा घातला असताना कुटुंबासाठी खंबीरपणे उभ्या राहत आधार बनल्या, त्या नाशिकच्या मखमलाबाद नाका परिसरातील ललिताताई देशमुख-माळी. (lalita deshmukh mali is support of of cheated families inspirational nashik news)

ललिता भटू देशमुख... शिक्षण जेमतेम दहावी... माहेर नंदुरबार जिल्ह्यातील रनाळे येथील तर सासर देशशिरवाडे (ता. साक्री जि.धुळे)येथील... सध्याचे वास्तव्य नाशिकच्या मखमलाबाद नाका येथे... वडील दौलत गजमलराव माळी यांचे पत्नी प्रमिलाताई यांच्यासह एक मुलगा, दोन मुली असं शेतकरी कुटुंब... शेतीशिवाय दुसरे उत्पन्नाचे साधन नव्हते...ललिताताई दहावीत असतानाच वडिलांचे निधन झाले.

त्यामुळे ललिताताईंचे दहावीतच शिक्षण सुटले. पडेल ते काम करून वडिलांच्या जागी आधार होण्यासाठी माळी कुटुंबातील सदस्य प्रयत्नशील होते. ललिताताईंनी गावातच शिवणकामाचे प्रशिक्षण घेतले. ब्लाऊजची मिळणारी शिलाई जेमतेम असल्याने शेतमजुरीसह शिवणकामही त्या करत राहिल्या. कुटुंबाचा आधार होत असताना ललिताताईंचा विवाह ठरला. मात्र, सासरीही परिस्थिती जेमतेम... पती भटू धुडकू देशमुख यांचेही शिक्षण बारावी.

रोजीरोटीची लढाई लढण्यासाठी सासरीही प्रयत्न सुरू करावे लागले. कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा, यासाठी पती भटू यांनीही नाशिकची वाट धरली होती. याच काळात ललिताताई याही लग्नानंतर नाशिकमध्ये दाखल झाल्या. पती भटू हे त्यावेळी मेडिकल दुकानावर काम करत होते. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी माहेरचा कित्ता गिरवत त्यांनी पंचवटी परिसरात शिवणकाम सुरू केले. जेमतेम मिळणाऱ्या शिवणकामाच्या मजुरीचा कुटुंबाला आधार मिळत होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

याच काळात पती भटू यांनी पंचवटीत वास्तव्यास असताना बाजार समिती जवळच असल्याने भाजीपाला खरेदी विक्रीच्या व्यवहारात सहभाग घ्यायला सुरवात केली. देशमुख कुटुंबाने उधार उसनवार तसेच व्याजाने पैसे काढून स्वतःच्या मालकीची भाजीपाला कंपनी स्थापन केली. मुलगी कल्याणी, सृष्टी व काव्या यांच्यानिमित्ताने कुटुंबाची संख्या वाढली.

अपघाताने होत्याचे नव्हते झाले...

कुटुंबाला चांगले दिवस येतील, याची वाट बघणाऱ्या देशमुख परिवाराला नियतीच्या फेऱ्यात अडकल्यासारखे झाले. गावाकडे एका कार्यक्रमासाठी जात असताना पती भटू यांना अपघातामुळे चार महिने दवाखान्यात राहावे लागले. एका बाजूला व्हेजिटेबल कंपनीत अडकवलेले भांडवल आणि दुसरीकडे वैद्यकीय उपचारांच्या खर्चामुळे सर्व जबाबदारी ललिताताई यांच्यावरच येऊन पडली.

कुटुंबावर आलेल्या या संकटात त्यांनी स्वतःला सावरतानाच शिवणकामाच्या जोडीलाच ब्युटी पार्लरची जोड देत कष्टातून पतीला जीवघेण्या संकटातून बाहेर काढले. कुटुंबासाठी आधार होताना पतीलाही त्यांनी धीर देताना पुन्हा नव्याने उभे राहण्यासाठी बळ दिलं.

संकटांची मालिका सुरूच

कुटुंबावर आलेल्या प्रसंगातून स्वतःसह सर्व सदस्यांना सावरत ललिताताई यांच्या वाट्याला जणू संकटं पाचवीलाच पुजलेली होती. पती भटू यांनी पुन्हा भाजीपाला खरेदी करून गुजरातमध्ये विक्रीसाठी पाठविण्यास सुरवात केली. मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. याच काळात सुमारे अठरा लाखांचा माल गुजरातमधील व्यापाऱ्यांनी खरेदी केला, मात्र पैसे पाठवलेच नाहीत.

संबंधित व्यापाऱ्यांनी नाशिकशी संपर्क तोडल्याने कुटुंब पुन्हा आर्थिक खाईत लोटले गेले. ललिताताई यांनी पतीला धीर देतानाच पुन्हा कुटुंबाची सूत्रे आपल्या हाती घेतली. परप्रांतीय व्यापाऱ्यांनी गंडा घातल्याने माल घेतलेल्या शेतकऱ्यांचे पैसे परत करण्यासाठी नातेवाइकांकडून तसेच उधारउसनवारी, व्याजाने पैसा उभा करत परतफेड केली.

या काळात प्रसंगी कुटुंबात एक वेळ खायची भ्रांत आल्याने कधीकधी कुटुंबावर उपासमारीचीही वेळ निर्माण झाली होती.

मात्र सासू भागीरथा, आई प्रमिलाताई, भटू यांचे मामा मुरलीधर पगारे, वसंत पगारे, भाऊ नितीन, वहिनी मनीषा यांच्यासह ज्योती साठे, अर्चना रणमाळे, अरुणा जाधव या मैत्रिणींनी दिलेल्या मोलाच्या आधारावर कुटुंबासाठी त्या भक्कम उभ्या राहिल्या.

गरजूंसाठी बनल्या आधार

आयुष्यात आलेल्या जीवघेण्या संकटांमुळे कुटुंब उघड्यावर आलं. मात्र पतीला आधार देत असतानाच स्वतःच्या अंगी असलेल्या कलागुणांमुळे ललिताताई यांनी कुटुंबाला सावरतानाच शिवणकामाचे प्रशिक्षण देत सुमारे तीस ते पस्तीस मुलींना स्वबळावर या व्यवसायात उभे केले आहे.

पतीला झालेला अपघात, परप्रांतीय व्यापाऱ्यांमुळे कुटुंबाला नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागलेल्या ललिताताई यांनी शिवणकामासह ब्युटी पार्लर व्यवसायातून देशमुख कुटुंबाला दिलेलं बळ नक्कीच अभिमानास्पद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT